Mother Daughter Funny Video: आपल्या मुलीला जेवण बनवता यावं यासाठी प्रत्येक आई ही तिच्या मुलीला सुरूवातीपासूनच थोडं थोडं का होईना शिकवत असते. कधीही किचनमध्ये न फिरकलेल्या मुलींना जर किचनमध्ये जेवण बनवायला सांगितलं तर काय होईल, याची कल्पना न केलेलीच बरी. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एक देसी आई तिच्या लेकीला चपाती बनवायला शिकवतेय. पण चपाती शिकता शिकता या मुलीने जे केलं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निळ्या रंगाचे कपडे घातलेली आई तिच्या मुलीला स्वयंपाकघरात चपाती बनवताना शिकवतेय. स्टोव्हजवळ उभ्या आई तिच्या लेकीचा चपाती तव्यावर कशी भाजायची हे सांगताना दिसून येतेय. जसं जसं आई तिला चपाती भाजायला सांगते तस तसं मुलगी लाटण्याच्या मदतीने तर कधी हाताने चपाती भाजताना दिसून येतेय.
पण मुलगी मात्र यावेळी उलट सुलट चपाती भाजते. नंतर नंतर ही मुलगी असं काही करते की, तुम्हाला ते पाहून हसू येईल. ती तव्यावर ठेवलेल्या चपातीला लाटण्याने दाबू लागते. यानंतर आई म्हणते, ‘अशी भाकरी कोण भाजतं? हाताने भाज. मग आई तिला चपाती फिरवायला सांगते. लगेच या मुलीने तवाच उलटा फिरवला. हा मजेशीर व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरत नाही.
आणखी वाचा : ‘कच्चा बदाम’ या ट्रेंडिंग गाण्यावर तृतीयपंथीने केला जबरदस्त डान्स, लोक बघतच राहिले, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : शाळेत शिक्षिकेने विद्यार्थ्यानीसोबत केला डान्स, स्टेप्स पाहून सगळे झाले फॅन
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आवर्जून तो पुढे आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करण्यास विसरत नाहीत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडीओ अपलोड होताच तो व्हायरल देखील झालाय. इतर अनेक युजर्सनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.