मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्याला नेहमी काहींना काही नवीन आणि रंजक गोष्टी पाहायला मिळतात. त्यांच्या अकाउंटवर फक्त मजेशीर गोष्टीच शेअर केल्या जात नाहीत, तर मुंबई पोलीस आपल्या म्युजिकल बाजूसाठीही खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचा बँड नेहमीच ट्रेंडिंग गाण्यांचे कव्हर वाजवतो. मुंबई पोलीस बँड ‘खाकी स्टुडिओ’ने सोमवारी त्यांच्या खाकी स्टुडिओ चॅनलवर इजिप्शियन प्रसिद्ध गाणे ‘या मुस्तफा’चे सादरीकरण केले.

मुंबई पोलिसच्या खाकी स्टुडिओच्या सदस्यांना आपण सनई, सेक्सोफोन, ट्रम्पेट आणि बासरी वाजवताना पाहू शकतो. या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहलंय, ‘या मुस्तफा हे प्रसिद्ध इजिप्शियन बहुभाषिक गाणे आहे, जे प्रसिद्ध इजिप्शियन संगीतकार मोहम्मद फौजी यांनी संगीतबद्ध केले आहे. ते एका इजिप्शियन चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हे गाणे वेगवेगळ्या भाषांमध्ये रेकॉर्ड केले गेले असून ट्यून पॅरोडीजसह याच्या अनेक आवृत्त्या रेकॉर्ड केल्या गेल्या आहेत. हे गाणे पहिल्यांदा युरोपमध्ये लोकप्रिय झाले ते गायक बॉब आझम यांच्या मदतीने, ज्यांनी ते फ्रान्समध्ये १९६० मध्ये रिलीज केले.’

राजस्थानच्या रणरणत्या उन्हात सायकलवरून पोहोचवायचा डिलिव्हरी; नेटकऱ्यांनी मिळून केली अशी मदत

सायकल घेऊन उंच टेकडीवरून मुलीने मारली उडी; हा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून लोकांना हे सुरेल गायन आवडले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, ‘उत्तम! विविध वाद्यांसोबतच्या संगीत कौशल्यासाठी मुंबई पोलिसांना स्टँडिंग ओव्हेशन!’ दुसर्‍याने लिहिले, ‘उत्तम कामगिरी, इतके चांगले संगीत ऐकून मन प्रसन्न होते’. याआधी, मुंबई पोलीस बँडने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या लोकप्रिय चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याची ट्यून सादर केली होती, ज्याचे लोकांनी खूप कौतुक केले होते.

Story img Loader