Viral Video: शहरातील मोठमोठ्या शाळांतील शिक्षक असोत किंवा एखाद्या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे शिक्षक असोत; प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते. गावाकडच्या अनेक शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच इतर आवड निर्माण करणाऱ्या गोष्टीही शिकवल्या जातात. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी ही मुलं नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात, ज्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करताना दिसतात, तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वर्गशिक्षिकेने सर्व मुलांना एकच प्रश्न विचारला, यावर प्रत्येक जण मजेशीर उत्तर देताना दिसत आहे.
हल्ली सोशल मीडियावर गावाकडच्या शाळांमधील अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही व्हिडीओंमध्ये शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांसह सुंदर नृत्य करताना दिसतात, तर कधी कविता म्हणताना दिसतात. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलं आपल्या वडिलांविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वर्गातील सर्व मुलं एका लाईनमध्ये शिक्षिकेसमोर उभी राहिली असून शिक्षिका त्यांना त्यांच्या पप्पांविषयी माहिती सांगायला सांगतात… यावेळी प्रत्येक जण आपल्या वडिलांविषयी माहिती सांगायला सुरुवात करतात. यावेळी एक मुलगी म्हणते, “माझे पप्पा मी शाळेत नाही आले की लय मारतात.” तर दुसरा मुलगा म्हणतो, “आमचं पप्पा माझा अभ्यासच घेत नाहीत.” तर आणखी एक जण म्हणतो, “आमचे पप्पा मला खाऊ आणतात.” परंतु, यावेळी एक जण मुलगी म्हणते “आमचं पप्पा सारखं मोबाइल बघतात”, असं मजेशीर उत्तर देते. तिचं हे उत्तर ऐकून शिक्षिकादेखील मोठमोठ्याने हसायला सुरुवात करते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @usha.koshti.589 या अकाउंटवर शेअर केला असून यावर एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच एका युजरने लिहिलंय की, “पप्पांचा विषय लय हार्ड आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “सर्व किती गोड आहेत”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “पप्पा म्हणायचं सोडा आणि बाबा म्हणायचं शिकवा बाई”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “आता यांचे पप्पा हा व्हिडीओ बघून यांचा घरी गेल्यावर चांगला अभ्यास घेणार.”