पॅरॅलिसिस ही एक अशी परिस्थिती आहे की, ज्यामध्ये शरीरातील काही अवयव किंवा अर्ध्या भागाच्या हालचाली बंद होतात. त्यामुळे व्यक्तीच्या नैसर्गिक हालचालींवर मर्यादा येतात. अर्धांगवायू, लकवा, पक्षाघात ही एकाच आजाराची वेगवेगळी नावे आहेत. तुमच्या आजूबाजूला किंवा कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये ही समस्या उदभवल्याचं तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं असेल. दरम्यान, आता समोर आलेली घटना हादरवणारी आहे. कारण- एका शाळेत एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल ९० शाळकरी मुलींना अर्धांगवायूचा झटका झाला. हा आकडा ऐकून डॉक्टरही चक्रावले आहेत. तुमचाही यावर विश्वास बसत नाही ना? मात्र समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल. सोशल मीडियावर या मुलींचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हे प्रकरण समोर आलं.

९० मुलींना एकाच वेळी लकवा

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

ही संपूर्ण घटना केनिया देशातील एका शाळेतील आहे. येथील काकामेगा काउंटी येथील महाविद्यालयातील ९० विद्यार्थिनींसोबत काहीतरी विचित्र घटना घडली. सेंट थेरेमा एरगी महाविद्यालयातील या विद्यार्थिनी मागील काही आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल आहेत. एका भयंकर आजारामुळे त्यांच्या शरीरातील कंबरेखालच्या भागाला अर्धांगवायूचा झटका आल्यासारखे दिसत आहे. हे वृत्त timesofindia ने दिलं आहे.

VIDEO पाहून उडेल थरकाप…

मीडिया रिपोर्टनुसार, मुलींना चालण्यास त्रास होत होता आणि गुडघेदुखीची लक्षणं वाटतं होती. हे सगळं अचानक घडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अचानक या मुलींच्या पायांतील ताकदच निघून गेली आहे. अचानक अशी परिस्थिती का उदभवली याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत मुलींच्या रक्त व लघवीचे नमुने प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत. तसेच, शाळेतच असं काही घडलं आहे का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विद्यार्थिनी हॉस्पिटलच्या बेडवर अक्षरश: थरथर कापताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘जीतेंगे भाई जीतेंगे’ पाकिस्तानच्या गायकाचे वर्ल्ड कप साँग; ऐकाल तर हसून हसून लागेल पुरती वाट

शाळा बंद करण्यात आली

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची स्थिती पाहता, सेंट थेरेसा एरेगी गर्ल्स हायस्कूलच्या अधिकाऱ्यांनी शाळा बंद केली आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा >> फक्त २ मुलांना सांभाळण्यासाठी ८३ लाख पगार अन् सहा महिने सुट्ट्या; खाजगी विमानाने प्रवास करण्याचीही संधी

शरिरातील असंतुलनामुळे हा प्रकार घडला का?

स्थानिक अहवालानुसार हा आजार शरीरातील द्रवपदार्थांच्या असंतुलनामुळे होऊ शकतो. जेव्हा शरीरातील खनिजांचे प्रमाण खूप कमी किंवा जास्त होते, तेव्हा असे होते. अस्वस्थता, अशक्तपणा, मुंग्या येणे, थकवा, हृदय जोरात धडधडणे, मळमळ किंवा उलट्या, कमी किंवा उच्च रक्तदाब ही असंतुलनाची सामान्य लक्षणे आहेत.

Story img Loader