Nagpur Car Viral Video: सोशल मीडियावर तुम्हाला दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. दरम्यान, राज्यात एकीकडे अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना उपराजधानी नागपुरात एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यात धावत्या कारमध्ये चालक तरुण आपल्या प्रेयसीसोबत चक्क ड्रायव्हिंग सीटवर बसून अश्लील चाळे करताना आढळून आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे.
बेजबाबदार युगुलाविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूरमधला धावत्या कारमध्ये प्रेमी युगुलाने अश्लील चाळे केल्याचा एका धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. धरमपेठ या नागपूरच्या उच्चभ्रू परिसरात हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, तो व्हिडीओ पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचला. एक तरुण रस्त्यावर कार चालवत असतानाच, त्या गाडीत असलेली तरुणी त्याच्या मांडीवर बसून अश्लील चाळे करीत होती. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पोलिसांपर्यंत पोहोचला. अखेर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत, त्या युगुलाविरोधात गुन्हा दाखल करीत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नागपुरातील लक्ष्मी भुवन चौक ते शंकर नगरदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
सीए तरुण अन् इंजिनीयर प्रेयसी
आरोपी तरुण सीए असून, त्याची प्रेयसी इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. दोघेही वर्षभरापासून एकत्र आहेत. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास ते दोघे बाहेर जात होते. मात्र, लक्ष्मी भुवन चौक ते शंकर नगरदरम्यान हा सर्व गैरप्रकार सुरू झाला. यावेळी रस्त्यावरील अन्य वाहनचालक बघत होते; मात्र दोघांना काहीही फरक पडला नाही. दरम्यान, बाईकवरून जाणाऱ्या एका इसमाने त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओ व्हायरल होताच हा व्हिडीओ पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांपर्यंत पोहोचला.
आरोपी तरुणाला अटक
त्यानंतर या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन, त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपी युवक झिंगाबाई टाकळी परिसरातील रहिवासी आहे. मीडियावरील क्लिपमध्ये त्या कारचा नंबर दिसत होता, त्याद्वारे पोलिसांनी आरोपी तरुणाचा शोध घेतला आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अभ्यास करतानाच पोलीस भरतीचा निकाल लागला; सर घरी आले अन् कष्टाचं चीज झालं; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
कोण आहेत हे गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्ड?
सूरज राजकुमार सोनी (वय २८ वर्ष, रा. मानकापूर), असे या तरुणाचे नाव आहे. त्याने चार्टर्ड अकाउंटंट म्हणून शिक्षण पूर्ण केले आहे. त्याची मैत्रीण मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.