लग्न हा प्रत्येकासाठी खास सोहळा असतो. सर्वात जास्त खास हा त्या वधू-वरांसाठी असतो. यामध्ये वधू आणि वर पूर्ण आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, कारण लग्न एकदाच होते. आजचे वधू-वरही लग्नात एकत्र डान्स करताना दिसतात. लोकांना वधू-वरांचा डान्स पाहायला आवडतो.खरतर, आजचे वधू-वर लग्नाआधी डान्सची तयारी करतात. यानंतर, एका खास प्रसंगी, तो डान्स परफॉर्मन्स करतात. वधू-वरांचे स्टेजवर नृत्य करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. व्हिडीओमध्ये वधू आणि वर समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा डान्स करताना दिसत आहेत.
नृत्याच्या शैलीने एकच गोंधळ उडाला
व्हिडीओतील वधू-वरांची डान्स स्टाइल पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ढोल-ताशांच्या तालावर वधू-वरांनी आपल्या नृत्याने दहशत निर्माण केल्याचे पाहायला मिळते. या दोघांचा डान्स पाहून नातेवाईकही हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की, नवरदेव आधी बीच रोडवर ढोल-ताशांच्या तालावर नाचू लागते. या दरम्यान, नवरदेव देखील आपल्या वधूकडे नाचण्यासाठी हातवारे करतो.
(हे ही वाचा: भारतीय जवानाचा गुडघाभर बर्फात कणखरपणे उभा असलेला व्हिडीओ Viral; देशवासीयांनी मानले आभार)
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वराने आपल्या वधूकडे इशारा करताच, वधू आपली चप्पल काढून बाजूला ठेवते आणि नंतर अशा प्रकारे नाचते की तेथे उपस्थित नातेवाईक आणि पाहुणे आश्चर्यचकित होतात. आपल्या वधूचा हा डान्स पाहून वरही दंग आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही दोघांचा डान्स आवडेल.
(हे ही वाचा: Photos: पार्ले-जी मधील ‘जी’ चा नेमका अर्थ तुम्हाला माहीत आहे का?)
(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)
व्हायरल होतोय व्हिडीओ
हा डान्स व्हिडीओ इंस्टाग्रामवर weddingsfever नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही तुमच्या जिवलग मित्रासोबत लग्न करता तेव्हा हा उत्साह असतो.’ व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.