टोकियो ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताची मान अभिमानाने उंचावणारा नीरज चोप्रा सध्या आपल्या एका कृतीमुळे चर्चेत आहे. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याआधीही त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्याचे लोकांनी कौतुक केले आहे. परंतु, नीरज सध्या त्याच्या संस्कारांमुळे चर्चेत आहे.
स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले होते. यासह त्याने एका महिन्यात दुसऱ्यांदा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. पण यापेक्षाही त्याच्या संस्कारांचीच जास्त चर्चा होत आहे. वास्तविक, त्याच्याशी संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या एका चाहत्याच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे.
या व्हिडीओमधील नीरज चोप्राची विनम्रता आणि त्याचा सुसंस्कृतपणा पाहून प्रत्येकजण त्याचा फॅन झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की नीरज आपल्या चाहत्यांशी बोलत आहे. दरम्यान, तो त्यांच्यासोबत फोटोही काढत आहे. यानंतर त्यांचा निरोप घेताना नीरज त्यांच्यातील एका वृद्ध चाहत्याच्या पाया पडतो.
आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो की जेव्हा नीरज चोप्रा एका वृद्ध चाहत्याच्या पायाला स्पर्श करून निघून जातो तेव्हा एका चाहत्याने त्यांचे कौतुक केले आणि ‘सो डाउन टू अर्थ’ म्हटले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नीरज चोप्राने आपल्या नम्रतेने लोकांची मने जिंकली आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ अडीच लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.