Viral video: सोशल मीडियामध्ये दररोज नवनवीन व्हिडीओ शेअर होत असतात. काही रंजक असतात, काही विनोदी असतात, काही थरारक असतात, तर काही व्हिडीओ पाहून गोंधळ उडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका तरुणाचं अवघ्या २० सेकंदांनी जहाज हुकलं; मात्र शेवटी जे झालं, त्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असं म्हणतात की गेलेली वेळ पुन्हा येत नाही. वेळेला धनापेक्षाही अधिक मौल्यवान मानले गेले आहे. आपण गमावलेला पैसा पुन्हा कमावू शकतो; पण गमावलेला वेळ परत मिळू शकणार नाही. वेळेचं महत्त्व आपल्या जीवनात अत्यंत मोठं आहे. वेळ म्हणजे जीवनाचा तो अमूल्य घटक आहे; जो एकदा निघून गेला की, पुन्हा परत मिळवता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्याचं मोजमाप वेळेच्या आधारे केलं जातं. काळ कोणासाठीही थांबत नाही, याचंच उदाहरण दाखविणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एका तरुणाचं अवघ्या २० सेकंदांनी जहाज हुकलं; मात्र नंतर चमत्कार व्हावा तसं काहीसं घडलं. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा याला नशीब म्हणाल की आणखी काही?

नेमकं काय घडलं?

व्हिडीओमध्ये एक शिपिंग यार्ड दिसत आहे. या शिपिंग यार्डमध्ये अनेक प्रवासी दिसून येत आहेत. मात्र, व्हिडीओच्या सुरुवातीस एक व्यक्ती आहे, जी एक जहाज पकडण्यासाठी धावत जात असते. कारण- त्याला जहाज पकडायला उशीर झालेला असतो; मात्र शेवटी काही क्षणांमुळे त्याचं जहाज निघूनच जातं. यावेळी तो निराश होतो आणि डोक्याला हात लावतो. मात्र पुढच्याच क्षणी एक व्यक्ती येते आणि त्याला सांगते की, ते गेलेलं जहाज त्याचं नव्हतंच. तर बाजूला जे उभं आहे, ते जहाज आहे त्याचं, हे ऐकताच तो आश्चर्यचकित होतो. क्षणात त्याचं दु:ख आनंदात बदलतं. क्षणात हुकलेली संधी एका आणखी मोठ्या आनंदात बदलते. ते पाहून त्या व्यक्तीला खूप आनंद होताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना दुसऱ्या जहाजामधील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्हीही आवडीने चायनीज खाताय? जरा जपून…’हा’ VIDEO पाहाल तर झोप उडेल; नागरिकही संतापले

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Arteymas_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, नेटकरीही त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video news of man went to travel in a ship but you see what happened next watch full video srk