आजपर्यंत तुम्ही सापांचे अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील, कधी अतिउत्साहाने साप पकडायला जाणाऱ्यांवर सापाने केलेला हल्ला असेल किंवा कधी एखाद्या गाडीत, घरामध्ये घुसलेला भलामोठा साप असेल. असे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिलात तर तुमच्या अंगावर देखील शहारा येईल.

कारण, या व्हिडीओमध्ये डॉक्टरांनी एका महिलेच्या तोंडातून तब्बल ४ फुट लांबीचा साप काढल्याचं दिसतं आहे. सध्याच्या जमाना डिजिटल आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ नेटकरी काही क्षणात सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. ते कधी थरारक तर कधी कॉमेडी असतात.

Prasad Khandekar
“अमेरिकेत…” प्रसाद खांडेकरने सांगितला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या नावाचा विनोदी किस्सा; म्हणाला, “नमा मला एक चिक्की…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Boy hold funny poster on valentine day funny video goes viral on social media
VIDEO “नाही माझ्याकडे पप्पाची परी म्हणून…” तरुणानं खास सिंगल लोकांसाठी लिहली पाटी; पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
chhaava new song aaya re toofan release now marathi singer vaishali samant
मुघलांशी संघर्ष ते सिंहाचा जबडा फाडला…; ‘छावा’च्या नव्या गाण्याला मराठमोळ्या गायिकेचा आवाज; अंगावर येईल काटा, सर्वत्र होतंय कौतुक
Viral Video Shows Aunt and nephew Beautiful moment
नाते मावशी-भाच्याचे… चंद्रा गाण्यावर ‘तिला’ नाचताना पाहून बॉडीगार्डसारखा राहिला उभा; पाहा चिमुकल्याचा VIDEO
AAP MLA Dinesh Mohaniya booked for flying kiss
Video: प्रचारादरम्यान महिलेला दिला फ्लाईंग किस; ‘आप’ आमदारांवर गुन्हा दाखल
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार

आणखी वाचा- १८ फुटाच्या अजगराने एका दमात गिळली ५ फुटाची मगर; नंतर अशी हालत झाली की…; Viral Video पाहून उडेल थरकाप

पण आता जो व्हिडीओ तुम्ही पाहणार आहात तो तुम्हाला थक्क करणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रशियातील असून एक महिला गाढ झोपेत असताना तिच्या तोंडात तब्बल चार फुटी साप शिरला, ती झोपेत असल्यामुळे तिला या गोष्टीची जाणीव झाली नाही. मात्र, काही वेळाने तिला भयंकर त्रास जाणवू लागला आणि ती बेशुद्ध झाली.

दरम्यान, या महिलेला तत्काळ रशियातील एका हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांच्या प्रचंड मेहनतीनंतर तो साप महिलेच्या तोंडातून बाहेर काढण्यात आला. पण धक्कादायक बाब म्हणजे हा साप डॉक्टरांनी बाहेर काढला तरी जीवंत होता शिवाय सापाला बाहेर काढताच त्याने डॉक्टरांवर देखील हल्ला केल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ फॅन्टॅस्टिक फॅक्टस् (Fascinating Facts) या नावाच्या अकाउंटर शेअर करण्यात आला आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, “या महिलेच्या तोंडातून ४ फुट लांब साप काढला आहे. ती झोपेत असताना हा साप तिच्या तोंडात शिरला होता.” हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून आत्तापर्यंत १७ लाख जणांनी तो पाहिला आहे, तर ४० हजार लोकांनी तो लाईक केला आहे.

Story img Loader