प्रशासकीय अधिकारी आणि नेत्यांमध्ये अनेकदा वाद झाल्याच्या बातम्या आणि व्हिडीओ समोर येतात. अशा वादांमध्ये अनेकदा नेतेमंडळी अधिकाऱ्यांना फैलावर घेताना दिसून येतं. सामान्यपणे अनधिकृत बांधकांमाविरोधातील कारवाई किंवा आपल्या मतदारसंघामधील कारवाईच्या वेळी नेत्यांकडून आडकाठी आणण्याचे प्रकार घडताना पहायला मिळतात. यातूनही अनेकदा वादावादी होतो आणि कधीतरी अगदी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक महिला आयएएस अधिकाऱ्याने भाजपाच्या माजी आमदाराला झापताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी या महिला जिल्हाधिकाऱ्याचं कौतुक केलंय.

नक्की पाहा >> “माझ्याकडे पाहून लोकांना आम्ही माणसं खातो की काय असा संशय आला”; भाजपा आमदाराच्या भाषणाचा Video Viral

काय काम सुरु होतं?
झालं असं की, मध्य प्रदेशमधील बडनगर येथे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासंदर्भातील नियोजन करण्यासंदर्भात प्रशासनाचं काम सुरु होतं. येथील घरांमध्ये पाणी शिरत असल्याची तक्रार स्थानिकांनी केल्यानंतर एसडीएम असणाऱ्या निधी सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक पथक येथील रस्त्याच्या बांधकामामध्ये सुधारणा करुन पाणी साचणार नाही यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी पोहोचले.

नक्की पाहा >> जेव्हा मुख्यमंत्र्यांनाही पाणीपुरी स्टॉलवर पाणीपुरी बनवण्याचा मोह आवरत नाही; Video झाला Viral

भाजपाच्या कोणत्या नेत्याने घेताला आक्षेप
पोलिसांचा बंदोबस्त, जेसीबीसहीत या कामाची तयारी सुरु असतानाच त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या निधी सिंह यांच्याबरोबरच भाजपाचे माजी आमदार शांतीलाल धबाई वाद घालू लागले. या कामाला शांतीलाल यांचा विरोध होता. त्यांनी निधी यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी निधी यांनी माजी आमदाराला जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही शांतीलाल हे शांत झाले नाहीत. आपल्या समर्थकांसोबत या ठिकाणी पोहचलेल्या शांतीलाल यांनी थेट निधी यांना कामावरुन हटवण्याची धमकी दिली.

नक्की वाचा >> ‘झाडी, डोंगार, हाटील’ने सारेच झाले इम्प्रेस पण शहाजीबापूंनी घरात पाऊल ठेवताच पत्नी म्हणाली, “काय ते बोलून राहीला डोंगार बिंगार, नीट…”

कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिल्यानंतर संताप
मी तुला नोकरीवरुन काढून टाकेन, अशी धमकी शांतीलाल यांनी निधी यांना दिली. कॅमेरासमोरच हा सारा प्रकार सुरु होता. सुरुवातीला शांतीलाल यांच्याकडे लक्ष न देणाऱ्या निधी यांनी अचानक संतापल्या. त्यांनी नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देणाऱ्या शांतीलाल यांना थेट, “तू कौन होता है मुझसे मेरी नौकरी पर बोलने वाला, औकात है तो नौकरी से निकालकर दिखा, चल दफा हो यहां से”, असं म्हणत फटकारलं.

नक्की पाहा >> पूर आलेल्या नदीतून विद्यार्थ्यांचा प्रवास; अंगावर काटा आणणारा Video व्हायरल झाल्यावर शिक्षणमंत्री म्हणतात, “मला…”

तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

नक्की पाहा >> Video: …अन् काही क्षणांमध्ये गाडी पूराच्या पाण्यात वाहून गेली; असा मूर्खपणा कृपया करू नका

कौतुकाचा वर्षाव…
त्यानंतर शांतीलाल यांचे समर्थक पोलिसांच्या मदतीने त्यांना तिथून घेऊन गेले आणि कामाला सुरुवात झाली. निधी आणि शांतीलाल यांच्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आपल्या कामाबद्दल ठाम निश्चयाने भूमिका घेणाऱ्या निधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. आता थेट सत्तेतील माजी आमदाराला कॅमेरासमोरच खडे बोल सुनावणाऱ्या निधी यांना सरकार पदावरुन हटवतं की त्यांच्या या भूमिकेबद्दल त्याचं कौतुक करतं हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

Story img Loader