Viral Video: शेवटी “आई ती आईच.” तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. याची प्रचिती आपल्या प्रत्येक प्राणिमात्रामध्ये दिसून येते. मग तो मनुष्य असो की इतर प्राणी. सोशल मीडियावर दररोज विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. कारण- अशा व्हिडीओंमधून प्राण्यांच्या जीवनशैलीबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्याला कळतात. त्यामध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर कधी प्राणी आपल्या लेकरांना जीव लावताना दिसतात. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; ज्यात एका प्राण्याचा त्याच्या आईबरोबरच्या नात्याचा सुंदर क्षण पाहायला मिळत आहे.
या जगात लेकरावर त्याच्या आईएवढे प्रेम कोणीही करू शकत नाही. जगातील इतर नात्यांमध्ये स्वार्थ निर्माण होतो; पण, आई आणि तिच्या लेकरांच्या नात्यात कधीच कुठला स्वार्थ येत नाही. मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी, आई नेहमीच प्रत्येक गोष्टीत स्वतःच्या आधी आपल्या लेकरांचा विचार करते. स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरते. आईच्या तिच्या मुलांवरच्या प्रेमाची एक नाही लाखो उदाहरणे आहेत; ज्यातून मुलांबद्दलचे नि:स्वार्थी प्रेम दिसून येते. सध्या जंगालातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय; ज्यात एक म्हैस तिच्या रेडकूला वाचविण्यासाठी सिंहाच्या शावकाबरोबर सामना करताना दिसत आहे.
रेडकाला वाचविण्यासाठी म्हशीची तळमळ
हा व्हिडीओ जंगालातील गवताळ प्रदेशातील असून, त्यामध्ये सिंहाचे दोन शावक म्हशीच्या रेडकूवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण, यावेळी म्हैस आपल्या रेडकूला शावकांच्या तावडीतून वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी ती रेडकूच्या अंगावर धावून येणाऱ्या शावकांना शिंगाने दूर करीत आहे. रेडकूला वाचविण्यासाठी तिची ही तळमळ पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ ट्विटरवरील @PrathamWaidande या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर आतापर्यंत हजारो व्ह्युज मिळाल्या असून, त्यावर अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारे आईचे प्रेम दाखविणारे प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामध्ये कधी आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आई स्वतःचे बलिदान देताना दिसली होती; तर कधी आपल्या पिल्लासाठी संघर्ष करताना दिसली होती.