Viral Video: कामावर जाताना अनेकदा काही कारणांस्तव रस्त्यावर वाहतूक ठप्प झाल्याचं आढळून येतं. काही गाड्या रस्त्याच्या मधोमध बंद पडतात; तर काही वाहनचालकांचं एकमेकांशी भांडण होतं. अशा अनेक कारणांमुळे अनेकदा रस्त्यावर वाहतूक ठप्प होते आणि मग ऑफिसला पोहोचायला उशीर होतो. तसेच अशाच स्वरूपाची कारणं अनेकदा ऑफिसला जाणारी मंडळी बॉसला देत असतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर अपडेट होत असल्यामुळे ऑफिसला पोहोचायला उशीर झाल्याचं कारण त्यानं बॉसला दिलं आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नोएडाचा रहिवासी प्रतीक राय एथर (Ather) स्कूटरवर बसून ऑफिसला जायला निघतो. पण, सकाळी स्कूटर स्टार्ट करताच रस्त्याच्या मधोमध सॉफ्टवेअर अपडेट होण्यास सुरुवात होते. त्यामुळे तरुणाला स्कूटरवरून उतरताही येत नव्हतं आणि स्कूटर सोडून ऑफिसलाही जाता येत नव्हतं. त्यामुळे तरुणाला ऑफिसला जाण्यासही उशीर झाला आहे, असं भन्नाट कारण त्यानं शोधून काढलं आहे. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”

हेही वाचा…डॉली चहा विक्रेता पुन्हा चर्चेत! व्हायरल वडापाव गर्लची घेतली भेट; VIDEO शेअर करीत म्हणाला, ट्रोल…

व्हिडीओ नक्की बघा…

लॅपटॉप, मोबाईल, संगणक एखाद्या वेळेस अपडेटला गेला की, पूर्ण सॉफ्टवेअर अपडेट होईपर्यंत तुम्ही ते उपकरण चालू करू शकत नाही. तर आज असंच उदाहरण सोशल मीडियावर पाहायला मिळालं आहे. ऑफिसला जायला तरुण निघतो तेव्हा स्कूटरचं सॉफ्टवेअर अचानक अपडेट होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्या तरुणाला स्कूटर स्टार्टसुद्धा करता येत नव्हती आणि अपडेट पूर्ण होईपर्यंत तो तिथेच अडकून पडला आणि त्याला ऑफिसला उशिरा पोहोचण्यासाठी नवीन कारण मिळालं.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @praaatiiik या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “मला ऑफिसला जायला उशीर झाला. कारण- माझी स्कूटर अपडेट होत होती”, अशी कॅप्शन तरुणानं व्हिडीओला दिली आहे. तसेच एका इथर युजरने सुद्धा हीच समस्या हायलाइट केली आहे.

तसेच हा व्हिडीओ पाहून एथर (Ather) कंपनीनं, “हे आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! आम्ही तुमच्या फीडबॅकची नोंद घेतली आहे आणि तो संबंधित टीमसोबत शेअर केला आहे. तुम्हाला इतर काही समस्या असल्यास किंवा आणखी मदत हवी असल्यास, आम्हाला डायरेक्ट मेसेज (DM) करण्यास अजिबात संकोच करू नका. आम्ही नेहमी मदत करण्यासाठी उपलब्ध आहोत”, अशी प्रत्युत्तरादाखल कमेंट केली आहे.

Story img Loader