Viral Video: समाजमाध्यमांवर फक्त व्हिडीओ, व्लॉग बनवून, त्यावर लाखो रुपये कमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेक लोक आपली नोकरी, व्यवसाय सोडून दिवसभर रील्स बनवणे, पर्सनल व्लॉग तयार करणे अशा गोष्टी करतात. पण, असेही अनेक लोक आहेत की, जे आपली नोकरी, व्यवसाय करीत मिळालेल्या वेळेत रील्स बनवतात. रील्सद्वारे ते डान्स व अभिनय करणे, गाणी गाणे अशा कला सादर करीत असतात. कधी डॉक्टर, कधी पोलिस, तर कधी घरकाम करणाऱ्या महिला अशा अनेकांना आपण रील्स बनविताना पाहिले आहे. पण, सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक नर्स डान्स करताना दिसतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा प्रकारच्या नानाविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीच काय अनेक सामान्य लोकही आपली कला सादर करताना दिसतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका हॉस्पिटलमधील नर्स मोकळ्या वेळेत डान्स करताना दिसतेय. यावेळी ती सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असलेल्या ‘आँख’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावेळी डान्समधील प्रत्येक स्टेप ती अगदी हुबेहूब करीत असून, तिचा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ Xवरील अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत हजारो व्ह्युज मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “तुम्ही तर त्या डान्समधील अभिनेत्रीपेक्षा भारी डान्स करता.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुमचा डान्स पाहून पेशंटला अ‍टॅक येईल.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स करता सिस्टर तुम्ही.”