Viral Video of 4 year old boy locked up in the school: सोशल मीडियावर नेहमी विविध व्हिडीओ व्हायरल होताना आपल्याला दिसतात; यात लहान मुलांच्या व्हिडीओचं प्रमाण जास्त असते. त्यात शाळकरी मुलांचे, शिक्षक-विद्यार्थांचे अनेक व्हिडीओ आपण रोजच बघतो. परंतु, आता असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात मुलाच्या नव्हे तर शिक्षकांच्या चुकीमुळे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षा भोगावी लागतेय.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video of 4 year old boy locked up in the school)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत (Viral Video) उत्तरप्रदेश येथील प्रयागराजमधील यमुनापार भागातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. लोहरा प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शिवांश पाल या चार वर्षांच्या मुलाला शाळेत बंद केल्याची घटना नुकतीच घडली आहे. तब्बल चार वर्षांचं हे लेकरू शाळेत कितीतरी तास कोंडलं गेलं होतं. शाळा सुटल्यानंतर घाईघाईत शाळेचे गेट बंद करून शिक्षक घरी पळाले, पण मागे हे लेकरू राहलं आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली

हेही वाचा… Viral Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; १ सेकंदाच्या प्रसंगावधनाने बचावला जीव, वादळी-वाऱ्याने उडालं छप्पर अन्…

चार वर्षांचा शिवांश त्याची बहीण शिवानीबरोबर शाळेत गेला होता. शिवांश या शाळेचा विद्यार्थी नव्हता. काही काळ लोटल्यानंतर मुलगा घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी आणि कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

यानंतर शिवांश शाळेत अडकला आहे याची माहिती मिळताच सगळ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बीएसएच्या सूचनेवरून शिक्षक शाळेत पोहोचले आणि त्यांनी कुलूप उघडले. या घटनेबाबत कुटुंबीय व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

‘Mohd. Moin, ABP News’ या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. चार वर्षीय शिवांशचा शाळेत अडकल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुरूवातील शिवांश रडतानादेखील दिसतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी शिक्षकांच्या विरोधात संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

BSA प्रवीण कुमार तिवारी यांनी घेतली प्रकरणाची दखल

BSA प्रवीण कुमार तिवारी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकासह एकूण चार शिक्षक आहेत. मुख्याध्यापक शासकीय ड्युटीवर गेले आहेत, तर एक शिक्षिका प्रसूती रजेवर आहेत. BSA प्रवीण कुमार तिवारी यांनी प्रभारी मुख्याध्यापक जुली आणि दुसरी शिक्षिका ललिता यांना निलंबित केले आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

शाळा लवकर बंद होण्याचे गावकऱ्यांचे आरोप

शाळा बंद होण्याची वेळ २ वाजताची असून सर्व शिक्षक ११:३० वाजताच शाळा बंद करून निघून गेले होते, असा आरोप ग्रमस्थांनी केला आहे. याबद्दल चौकशी करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा… Viral Video: अबब! वरमाला घालताच वराने लगावली वधूच्या कानशिलात, त्यानंतर घडलं ‘असं’ काही की, VIDEO पाहून व्हाल थक्क

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लोहरा प्राथमिक शाळेत शिकवत असलेले सर्व शिक्षक उशिरा येतात आणि शाळा लवकर बंद करून निघून जातात. याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार केली आहे, तरीही यावर तोडगा निघत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Story img Loader