लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर नैराश्य येत असल्याचा अनेक घटना समोर येत आहेत. मात्र अशावेळी सकारात्मकता दर्शवणाऱ्याही काही गोष्टी घडत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तरुण मंडळीदेखील लाजतील. कारण या व्हिडीओत चक्क ९३ वर्षाच्या आजीबाई बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल झालेला हा व्हिडीओ आजींच्या नातवाकडून १० ऑगस्ट रोजी फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. गौरव साहा असं त्यांचं नाव आहे. कुटुंबाने फेसबुकवर वाढदिवसाचे फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दिसत असल्याप्रमाणे हा आजीबाईंचा ९३ वा वाढदिवस होता. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे आजी आपल्या घरात सुरु असलेल्या सेलिब्रेशनमध्ये हौसेने सहभागी झालेल्या दिसत आहेत. यावेळी त्या ‘आँख मारे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आजींचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.

‘आँख मारे’ हे गाणं अर्शद वारसीच्या १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटातील आहे. पण रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटामुळे हे गाणं पुन्हा एकदा प्रसिद्ध झालं. रणवीर सिंग या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता.