Petrol Pump Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात आपण अनेकदा अपघातांचे व्हिडीओही पाहिले असतील. अशा अपघातात काही जण आपला जीव गमावतात तर काहींना जीवनदान मिळतं. अपघात झाल्यानंतर दोन गटांमध्ये अनेकदा वाददेखील होतात आणि याचं रुपांतर मारामारीमध्ये होतं.

भररस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असतात. पण, तुम्ही कधी पेट्रोल पंपावर झालेला अपघात आणि मारामारी पाहिलीय का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात बाईकस्वार थेट पेट्रोल पंपावर वाऱ्याच्या वेगात बाईक नेतो आणि तिथल्या कर्मचाऱ्याला जोरात धडक देतो.

हेही वाचा… “जरा तरी लाज…”, मंदिरात बसलेल्या महिलेच्या गळ्यात खिडकीतून टाकला हात अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचारी खुर्चीवर बसलेला दिसतोय. तेवढ्यात पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या बाईकचालकाचा बाईकवरून तोल सुटतो. अगदी वाऱ्याच्या वेगाने तो पेट्रोल पंपाजवळ येतो आणि बाईकनं खुर्चीवर बसलेल्या माणसाला धडक देतो. या बाईकस्वाराच्या मागच्या सीटवर अजून एक माणूस बसला होता. बाईकची धडक बसताच पेट्रोल पंपावरील माणूस खुर्चीसकट मागच्या दिशेला ढकलला जातो. त्यावर संतप्त होऊन खुर्चीवर बसलेला इसम रागात उठतो आणि त्या दोघांना मारायला लागतो. ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळलेलं नाही.

https://www.instagram.com/reel/C_k9sunS_ji/?igsh=MWZyOXQyYzlnY3BlZw%3D%3D

हा व्हिडीओ @_umesh_damor633 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘ये क्या हो गया भाई’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओला तब्बल २.५ मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… भररस्त्यात कपलने काय केलं पाहा! गाड्या थांबल्या तरी भान नाही, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “पेट्रोल घ्यायला आलेला की जीव घ्यायला?” तर, दुसऱ्याने “तो यापुढे कधीच खुर्चीवर बसणार नाही”, अशी कमेंट केली. तर तिसऱ्याने “त्याला अजून मारलं पाहिजे”, अशी कमेंट केली.

हेही वाचा… वो स्त्री है कुछ भी कर सकती है! दिवाळीच्या साफसफाईला केली दणक्यात सुरुवात; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

दरम्यान, याधीही सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात अपघातानंतर भांडणं आणि हाणामारी झाली आहे, जी जीवावरदेखील बेतली आहे.