Daughter Viral video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाई कुठेही रील्स बनवायला लागली आहे. एकदा का आपली रील व्हायरल झाली की, त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीची, तसेच लाइक्स आणि कमेंट्सची नशा या पिढीतल्या काहींना लागली आहे. या व्हायरल व्हिडीओंचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अगदी रेल्वेस्थानकावर, मेट्रोत, मैदानात, सार्वजनिक ठिकाणी मिळेल त्या जागेवर हे रीलस्टार व्हिडीओ शूट करताना दिसतात. अशातच एका तरुणीची रील सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. एका व्हिडीओसाठी तिने सगळ्या मर्यादाच ओलांडल्या आहेत. चक्क रुग्णालयात आई खाटेवर असताना त्याच खोलीत ही तरुणी डान्स करताना दिसतेय.

हेही वाचा… VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क रुग्णालयात डान्स करताना दिसतेय. काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी ही तरुणी रुग्णालयात असा असंवेदनशील प्रकार करतेय. या तरुणीच्या आईची तब्येत बरी नसल्यानं तिला रुग्णालयात दाखल केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. आजारानं त्रस्त असलेली आई खाटेवर असताना ही तरुणी त्याच खोलीत रील करताना दिसतेय. रुग्णालयात असलेल्या आईच्या आजारपणात ही मुलगी स्वत: नृत्याद्वारे रील बनविण्याचा आनंद घेताना दिसतेय.

हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला अवघ्या दोन तासांत १.४ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. “ही मुलगी रुग्णालयात आहे. या मुलीच्या मागे खाटेवर असलेली व्यक्ती तिची आई आहे. हा रीलचा ‘आजार’ एवढा पसरला आहे की, आई रुग्णालयातील खाटेवर उपचार घेत असूनही मुलगी तिच्यासमोर नाचून रील बनवत आहे. आपल्या देशाचं हे काय होत आहे?”, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. यादरम्यान असंही म्हटलं जातंय की, वेळ घालवावा म्हणून तिनं रील केली, असं त्या तरुणीचं म्हणणं आहे.

हेही वाचा… आधी ड्रेस खेचला मग बुक्क्यांनी मारलं! सरपंच पतीला गर्लफ्रेंडबरोबर पाहून पत्नीने घातला राडा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच काही नेटकऱ्यांनी तरुणीच्या या कृतीला असंवेदनशील म्हणत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत; तर काहींनी तिची बाजू मांडत आपलं मत मांडलं आहे. एका युजरनं कमेंट करत लिहिल, “या मुलीला कसलीच काळजी नाही आहे. आई आजारी आहे आणि ही बेशरम मुलगी नाचतेय.” तर दुसऱ्यानं, “तिची आर्थिक स्थिती कोणाला माहीत आहे? या कृत्यामागे काहीतरी कारण असू शकतं,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “कदाचित या व्हिडीओमुळेच तिच्या आईवर उपचार होत असतील.” एक जण असंही म्हणाला, “अशी मुलगी नसलेलीच बरी.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel dvr