Viral Video of dog drowning in flooded water saved by men: पावसाळा सुरू झाल्यापासून काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. पावसाळ्यात धबधबे, समुद्र अशा अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. पावसाळ्यात अशी ठिकाणं काही काही वेळेस धोकादायक ठरू शकतात.

अनेकदा पर्यटकांना पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी बंदीही केली जाते. परंतु, प्रशासनाचं न ऐकता लोक आपला जीव धोक्यात टाकतात. त्यामुळे पावसाळ्यात घडलेल्या विविध स्वरूपाच्या अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना अनेकदा आपण पाहिले आहेत. माणसांसह अनेक जनावरंही अशा पूरस्थितीला बळी पडतात.

Young Man Swept Away by Flood
एवढी घाई कशाची! पुराच्या पाण्यात वाहून जात होता तरुण, वेळीच लोक धावून आले; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Lalbaugcha raja 2024 darshan mumbai devotees get pushed shoved at lalbaugcha raja amid stampede like situation
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?
Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
Baby saved from flood water this incident reminiscent of the birth of Krishna
कृष्ण जन्माची आठवण करून देणारा प्रसंग! पुराच्या पाण्यातून चिमुकल्याला वाचवले, Viral Video एकदा बघाच
Gold Silver Price
Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांना धक्का! जाणून घ्या मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल
rickshaw driver beaten, rickshaw Thakurli,
Dombivli : भोंगा वाजविल्याच्या रागातून ठाकुर्लीत रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारला

हेही वाचा… हा तर चमत्कार! आषाढी यात्रेत हरवलेल्या श्वानाने २०० किमी पायी चालून केला एकट्याने प्रवास; घरी परतल्याचे पाहताच मालकाचे अश्रू अनावर

असाच एक व्हिडीओ(Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अतिवृष्टी झाल्यानं पाण्यानं भरलेल्या रस्त्यात एक श्वान वाहून जाताना दिसत आहे आणि तितक्यात असं काही घडतं, जे पाहून तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एके ठिकाणी रस्ता संपूर्णत: पाण्यानं भरला आहे. जागोजागी पाणी साठलेलं आहे आणि तरीदेखील वाहनचालक आपली वाहनं या पाणी भरलेल्या रस्त्यामधून पुढे नेण्याचा कसोशीनं प्रयत्न करीत आहेत. अशातच पाणी साठलेल्या या रस्त्यावरून मधोमध एक श्वान वाहून जाताना दिसत आहे. तो पाण्यात बुडत असतानाच एक सदगृहस्थ त्याच्या मदतीला धावून येतो. त्याला पाण्यात बुडणारा तो केविलवाणा श्वान दिसतो आणि मग तो दयाळू माणूस लगेच त्या श्वानाच्या पायाला पकडतो आणि खेचून त्याला रस्त्याच्या कडेला आणतो.

नंतर एका माणसाच्या मदतीनं तो दयावान श्वानाला त्या साठलेल्या पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढतो. काही वेळ तो श्वान जागेवर तसाच निपचित पडल्यासारखा पडून राहतो. परंतु, काही वेळानं असं दिसतं की, तो मलूल झालेला श्वान उठून बसला आहे आणि आता व्यवस्थित आहे. हा व्हिडीओ ‘jabalpuriya_masti_me_raho’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा… Viral Video: हद्दच झाली! चपलेनं तोंडावर मारलं अन्…,दिल्ली मेट्रोमध्ये झालेली हाणामारी पाहून बसेल धक्का

युजर्सच्या प्रतिक्रिया (Dog drowning in flooded water saved by men, Users Comments)

व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “खूप छान काम केलं दादा! देव तुम्हाला या कामाचं चांगलं फळ देईल.” दुसऱ्यानं लिहिलं, “श्वानाला वाचविल्याबद्दल धन्यवाद!”