Viral video of a drowning man being saved by an ex-navy commando: पावसाचा मोसम सुरू झाला की नद्या, समुद्र, धबधब्यांजवळ पर्यटकांची गर्दी वाढते. पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी आपला क्वॉलिटी टाईम घालवतात.

आजकाल सोशल मीडियावर ‘हिडन जेम्स’ने प्रसिद्ध असलेली ठिकाणंही पर्यटकांना कळू लागली आहेत. त्यामुळे अशी ठिकाणं अडचणीत असली तरीही पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तिथे जाण्याचा धोका पत्करतात. अशा ठिकाणी गेल्यावर अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे, वादळी वाऱ्यामुळे किंवा दुसऱ्या काही कारणांमुळे पर्यटक अडचणीत सापडण्याची शक्यता असते आणि यामुळे काही जण तर आपला जीवदेखील गमावतात.

rahul gandhi statement in america, prime minister narendra modi
राहुल गांधीनी मोदींच्या पावलावर पाऊल टाकलं तर एवढं काय बिघडलं?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Hit and run Nagpur, political leader car Nagpur,
नागपुरात राजकीय नेत्याच्या कारचे ‘हिट अ‍ॅण्ड रन’, पाच वाहनांना धडक
Two bullets entered Vanraj Andekar body according to the postmortem report
वनराज आंदेकरांच्या शरीरात दोन गोळ्या शिरल्या; आरोपींकडून  तब्बल २४ वार, शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर 
Shivaji Maharaj statue sport a scar
शिवरायांच्या शिल्पकृतीत कपाळावरील जखमेच्या खुणेने नवा वाद; पुतळ्यावर खूण दाखवण्याचे कारण काय?
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
uday samant and rajan salvi
कोकणात उदय सामंत, राजन साळवी यांच्यातील वाद विकोपाला
Vanraj Andekar Shot Dead in Pune News| Pune Crime News Vanraj Andeka Attack
Vanraj Andekar Shot Dead : वनराज आंदेकरांवर बहिणीच्या पतीकडून गोळीबार; मालमत्तेच्या वादातून आंदेकरांचा खून

अशाप्रकारचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण, हा पर्यटक मज्जा म्हणून पाण्यात पोहायला गेला की अनावधानाने पडला हे अजूनही अनिश्चित आहे.

हेही वाचा… Viral Video: बहिणीबरोबर शाळेत गेलेला ४ वर्षांचा चिमुकला घरी परतलाच नाही; शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे घडलं ‘असं’ काही…

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक माणूस बुडत असताना एक माजी नौसेनेचे कमांडो त्याच्या मदतीला धावून येतात आणि त्याचा जीव वाचवतात.

व्हायरल व्हिडीओ (VIRAL VIDEO)

व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) आपण पाहू शकतो की, युपीच्या गाझियाबाद जिल्ह्यातील इंदिरापूरममध्ये बुडणाऱ्या माणसाला वाचवण्यासाठी माजी नौसेनेचे कमांडो धनवीर सिंग नेगी यांनी कालव्यात उडी मारली.

माहितीनुसार, मिलन विहार अभयखंडचे रहिवासी आणि नेव्हीचे माजी कमांडो धनवीर सिंग सोमवारी दुपारी ४:१५ च्या सुमारास नोएडा कार्यालयातून घरी परतत होते. परतताना वाटेत गौर ग्रीन या ठिकाणी त्यांना कालव्याजवळ काही लोकांची गर्दी दिसली. हे पाहताच ते तिथेच थांबले आणि त्यांनी पाहिलं की, एक युवक कालव्यात बुडत असताना त्याचे वडील आपल्या मुलाला वाचवण्यासाठी मदतीची याचना करत होते. परिस्थितीचा अंदाज घेत, वेळ न दवडता धनवीर यांनी तरुणाला वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली.

लाइव्ह हिंदुस्तानच्या रिपोर्टनुसार, तरुणाला कालव्यातून बाहेर काढल्यानंतर धनवीर सिंहने सीपीआर करून त्याच्या पोटातील पाणी काढले. त्यानंतर तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. पोलिस तरुणाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा… Viral Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; १ सेकंदाच्या प्रसंगावधनाने बचावला जीव, वादळी-वाऱ्याने उडालं छप्पर अन्…

धनवीर यांनी सांगितलं की, ते त्या तरुणाला ओळखत नाहीत आणि तो तरुण चुकून कालव्यात पडला की त्याने मुद्दाम उडी मारली होती हेही त्यांना माहीत नाही. रिपोर्ट्सनुसार कालव्यात उडी मारताना नौसेनेचे कमांडो जखमी झाले.

धनवीर सिंह चालवतात खाजगी प्रशिक्षण केंद्र

धनवीर हे एक खाजगी प्रशिक्षण केंद्र चालवतात, जिथे ते मर्चंट नेव्हीसाठी सुमारे २०० मुलांना प्रशिक्षण देतात. स्थानिक नगरसेवकाने धनवीर यांच्या वीर कृत्याबद्दल त्यांचे आभार मानले असून पुढील महिन्यात स्वातंत्र्यदिनी त्यांचा सत्कार करण्याची घोषणा केली आहे.