Young Boy Fighting Video: सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा मजेशीर तर अनेकदा चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी जुगाड, कधी स्टंट , तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. तसेच लोकांच्या भांडणांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही आत्तापर्यंत मुलींच्या आणि महिलांच्या भांडणांचे व्हिडिओ पाहिले असतील. मुलांच्या फायटिंगचे देखील व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. दरदिवशी सोशल मीडियावर वाद-विवाद याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग कधी या वादविवादांचे कारण अतिशय छोटे असते तर कधी हा वादविवाद भयानक हाणामारीत बदलतो ते सांगता येत नाही. सध्या असाच एका तूफान हाणामाराची व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तरुणांनी थेट रेल्वे स्टेशनवरच हाणामारी केली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक रेल्वे स्टेशन दिसून येत आहे. हे मुंबईतलं कांदिवली रेल्वे स्टेशन आहे, रात्रीची वेळ असून रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची जास्त गर्दी नाही, मात्र याच काही तरुण प्रवासी आहे, ज्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. ते एकमेंकाना मिळेल ती वस्तू घेऊन मारत आहे. सर्व व्हिडिओ दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद करुन व्हायरल केला आहे. दोन जण नाही चार पाचजणे मिळून एकमेकांना मारत आहेत. भांडणाचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, तरुणांमध्ये तुफान हाणामारी सुरू आहे. या दृश्याचा व्हिडिओ तेथीलच एका प्रवाशाने कॅमेरात कैद केलेला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DD7ePAasj9a/?utm_source=ig_web_copy_link
हेही वाचा >> VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @mumbai.hai.bhai_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्हूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले असून मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, देवा काय हे कोणीही कुठेही भांडायला सुरूवात करत आहे.