Friend saved a life: मैत्री विचार करा, असं अनेकदा आपल्याला सांगितलं जातं. कारण- खरा मित्र मिळणं हे खूप कठीण तर असतंच; पण हा एक नशिबाचा भागदेखील असतो. खरा मित्र मिळायला नशीब चांगलं असायला लागतं, असं म्हणतात. सुखापेक्षा आपल्या दु:खात साथ देणारा मित्र कधीच आपल्याला सोडून जात नाही. कठीण काळात जो आपल्यासोबत सावलीसारखा उभा असतो, तोच खरा मित्र. म्हणून असा मित्र टिकवून ठेवणं खूप गरजेचं असतं.

अनेकदा सोशल मीडियावर मैत्रीच्या किश्शांचे, कहाण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, सध्या एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजतोय, ज्यात या लहानग्यांची मैत्री पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये आपला जीव धोक्यात घालून एक मुलगा आपल्या मित्राचा जीव वाचवतो. नेमकं काय घडतं ते जाणून घेऊ…

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral

हेही वाचा… काय भारी नाचलाय नवरदेव! वराचा ‘असा’ डान्स पाहून तुम्हीही व्हाल फिदा, VIDEO पाहून कराल कौतुक

…अन् मित्र मदतीला धावून आला

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आपल्या मित्रासाठी वाचवण्यासाठी या लहानग्यानं सगळं काही पणाला लावलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक मुलगा छतावरून अचानक खाली कोसळतो. खाली असलेला मुलगा त्याला वाचवण्यासाठी पुढे जातो. पण त्याला झेलण्याची ताकद त्या लहानग्यामध्ये नसल्याने तो धावत पुढे जातो आणि आपल्या मित्राला पाठीवर झेलतो. पाठीवर झेलताच छतावरून कोसळलेला मुलगा अलगद खाली पडतो आणि त्याला कोणतीही इजा होत नाही. मित्र असावा तर असा हे या व्हिडीओतून कळतं.

हा व्हिडीओ @friends_moments1050 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “मौत की क्या औकात है जब दोस्त मेरे साथ है” (मरणाची काय लायकी आहे जेव्हा मित्रच माझ्यासोबत आहे) असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल १.८ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… “चोर अजूनही डिप्रेशनमध्ये आहे”, घरात चोरी होऊ नये म्हणून पठ्ठ्याने केला जबरदस्त जुगाड! लॉकरचा दरवाजा उघडला अन्…, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “हे देवा, असा मित्र सगळ्यांना दे.” दुसऱ्याने, “हृदयस्पर्शी व्हिडीओ,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “मैत्री टिकवणारा बरोबर मैत्री टिकवतो.” एकाने, “असा मित्र नशिबाने भेटतो”, अशी कमेंट केली.

Story img Loader