सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ तुमचे मनोरंजन करतात तर काही अंगावर शहारा आणतात. शिवाय व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बाईकवर स्टंट करतानाच्या व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. बाईकवर स्टंट करणं हा काही ‘बच्चो का खेल’ नाही. कारण स्टंट करताना छोटीशी चूक देखील जीवघेणी ठरू शकते. शिवाय आता फक्त मुलंच नव्हे तर मुली देखील बाईकवर स्टंट करत असतात. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी अतिशय धोकादायक ठिकाणाहून बाईक चालवताना दिसत आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरंतर सोशल मीडियावर मुलींशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. खास करुन त्या गाडी चालवताना कशा चुका करतात हे सांगत त्यांची चेष्टा करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओंच्या कॅप्शनमध्ये ‘पापा की परी’ असं लिहिलेलं असतं. पण सध्या दोन मुलींचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकजण मुली देखील मुलांपेक्षा कमी नाहीत हेच दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

हेही वााचा- अधिकाऱ्याची पार्टी शेतकऱ्यांचे हाल; धरणात पडलेल्या मोबाईलसाठी २१ लाख लिटर पाणी घालवलं वाया

हेही पाहा- रस्त्यावर आंबे विकण्यासाठी लहान मुलाने केला अनोखा जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

हो कारण अतिशय उंच आणि दुर्गम अशा रस्त्यांवरुन ही मुलगी बाईक चालवता दिसत आहेत. शिवाय त्या आपल्या बाईकवरुन ती चारा घेऊन जाताना दिसत आहे. ही मुलगी रोजच्या रस्त्यावरुन बाईक चालवत असताना कोणीतरी तिचा व्हिडीओ शूट केला, जो सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ paguyonan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काहींनी या मुलीचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. तर काहींनी व्हिडीओतील ‘पापा की परी’ यावेळी चांगल्या पद्धतीने गाडी चालवत असल्याचं म्हटलं आहे.