Tigers and Dog Viral Video:  सोशल मीडियावर प्राण्यांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. जंगली प्राणी म्हटलं की ते एकमेकांची शिकार करतानाच या व्हिडीओत दिसतात. सिंह, बिबट्या, चित्ता, वाघ अशा प्राण्यांचे इतर प्राण्यांवर हल्ला करतानाचेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. एक-दोन नव्हे तर सात-सात वाघ असूनही त्यातल्या एकानेही समोर आलेल्या कुत्रीवर हल्ला केला नाही. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सारेच जण आश्चर्यचकित झाले आहेत. या सातही वाघांपैकी कुणीच का या कुत्रीवर हल्ला केला नसेल, याचं कारण लोक शोधण्यात व्यस्त झाले आहेत.

हा व्हिडीओ २६ मे रोजी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता, जो आतापर्यंत १.२ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे, तर ५२ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्री वाघांमध्ये बेधडकपणे फिरत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. वाघ तिच्याभोवती फिरताना आणि बसलेले दिसत आहे.  पण यातला एकही वाघ या कुत्रीला पाहून साधी डरकाळी सुद्धा फोडत नाही. ही कुत्री एका वाघाकडून दुसऱ्या वाघाकडे पळताना दिसून येतेय. या सर्व वाघाचं कुत्रीसोबत असं वेगळं वागणं पाहून लोक हैराण झाले आहेत.

आणखी वाचा : किचनमध्ये काम करताना मुलीने गायलेलं कोक स्टुडिओमधलं ‘Pasoori’ गाणं VIRAL, सुरेल आवाजाने तुम्ही प्रसन्न व्हाल!

हा व्हायरल व्हिडीओ पाहून सारेच जण प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. समोर कोणीही असो पुढच्या सेकंदाला आपली शिकार करणारे हे वाघ कुत्रीला पाहून इतके शांत कसे, हे लोकांना समजण्यास अवघड जात आहे. या कुत्रीसोबत वाघाचं कोणतं नातं तर नाही ना, असा देखील सवाल काही युजर्स करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओवरील प्रतिक्रिया वाचल्या असता याचं खरं कारण कळतं.

आणखी वाचा : डॉमिनोज पिझ्झा गर्लला लेडी गॅंगकडून बेदम मारहाण, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या रिक्षातून बाळ रस्त्यावर पडलं, अन् जीव धोक्यात घालून ट्रॅफिक पोलिसाने वाचवले प्राण

या व्हायरल व्हिडीओमधल्या कुत्रीचं नाव गोल्डन रिट्री असं आहे. कुत्रीने त्या वाघांना लहानाचं मोठं केलंय. इतकंच नव्हे तर ते जेव्हा लहान होते त्यावेळी या कुत्रीने त्यांना आपलं दूध पाजलं. यामुळेच या सात वाघांनी कुत्रीवर हल्ला केला नाही. हे सातही वाघ या कुत्रीला आपली आईला मानतात. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. वाघ आणि कुत्रीमधलं हे नातं कळाल्यानंतर सारेच आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर यावर आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.

Story img Loader