Terrifying Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ पाहून अगदी काळजाचा ठोकाच चुकतो. आजकाल गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढच चाललंय आणि माणुसकी संपत चाललीय. लहान-सहान कारणावरून लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. अगदी क्षुलक्क कारणामुळे ते समोरच्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघत नाहीत. सध्या असाच काहीसा भयंकर प्रकार नवी दिल्ली येथे घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक धक्कादायक घटना कैद झाली आहे, ज्यामध्ये एक माणूस दुसऱ्याला काठीने क्रूरपणे मारताना दिसत आहे. हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला तेव्हा पीडित फूटपाथवर आराम करत असल्याचे दिसते. ही घटना नवी दिल्लीतील मॉडेल टाऊन भागात घडली. हल्लेखोराने सार्वजनिक ठिकाणी लघवी करू नको असं सांगितल्यानंतर हा बदला घेण्यासाठी केलेला हल्ला असल्याचे मीडियामध्ये वृत्त आहे.

हेही वाचा… “टिप टिप बरसा पानी…”, महिलेचा अश्लील डान्स पाहून पोलिसांनी ओतलं अंगावर पाणी तर नगरसेवकाने… VIDEO एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला, पांढरा शर्ट आणि काळी पँट घातलेला हल्लेखोर फूटपाथवर झोपलेल्या माणसाच्या जवळ जाताना दिसतो. तिथे झोपलेल्या माणसावर हल्ला करण्याआधी तो त्याच्या डोक्यावरची चादर काढून खात्री करून घेतो. खात्री पटल्यानंतर, हल्लेखोर हातातल्या काठीने त्या माणसाला मारहाण करू लागतो. अचानक हल्ला केल्यामुळे तो माणूस झोपेतून जागा होतो आणि प्रचंड घाबरतो. काठीने खूपदा हल्ला केल्यानंतर तो आपला बचाव करण्यासाठी मागे हटतो. परंतु त्या माणसाला स्वत:चा वाचवण्यासाठी काही मार्गच सापडत नाही आणि हीच संधी साधून मारेकरी त्याच्यावर सतत हल्ले करत राहतो.

हा हल्ला सार्वजनिक उद्यानाच्या शेजारी घडला तेव्हा हल्लेखोराचे मित्रही तिथे उपस्थित होते. शेजारी बाईक लावून दोघं फक्त मजा घेत होते.

हेही वाचा… मुंबईच्या रस्त्यावर बाईकस्वाराने केली शिवीगाळ, लहान मुलाबरोबर असलेल्या कारचालकाने केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

हा व्हायरल व्हिडीओ @najafgarhconfes या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “दिल्लीचा अत्यंत भितीदायक CCTV व्हायरल व्हिडिओ! अवघ्या काही सेकंदात २१ वेळा काठीने मारलं. दिल्लीच्या मॉडेल टाऊनमध्ये एक व्यक्ती भगवी चादर पांघरून आरामात झोपत आहे. गुंड बाईकवर येतात आणि लाठ्या मारायला लागतात.” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा… तिने त्याच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये केलं ‘असं’ काही की दोघांना पडलं महागात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा हा VIDEO होतोय VIRAL

दरम्यान, आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती पण नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. पीडित व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधला की नाही हे अजूनही अस्पष्टच आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of a man beats another man after telling not to urinate in a public place in delhi dvr