Man fell into the boiled water: सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. या व्हिडीओमध्ये एक माणूस उकळत्या पाण्यात जाऊन पडतो. नेमकं काय घडतं ते जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला असेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक माणूस एका गरम पाण्याच्या टोपावर बसतो आणि गरम पाणी असलेल्या या टोपात तो पडतो. तो यात स्वत:हून पडतो की मुद्दाम पडतो हे अजून स्पष्ट झालं नाही. हा माणूस गरम पाण्यात पडताच आजूबाजूला माणसं गोळा होतात आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. अनेक प्रयत्न करून झाल्यानंतर शेवटी ते पाण्याचे भांडे खाली पाडत लोकं माणसाचा जीव वाचवतात.
हा व्हिडीओ @preet88476 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “हा माणूस गरम पाण्यात का बसला, कोणी सांगू शकेल का? काहीतरी मजबुरी असेल” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला १.२ मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.
हेही वाचा… बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
युजर्सच्या प्रतिक्रिया
माणसाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, हा व्हिडीओ मी पूर्ण पाहिला, मला वाटतं की हा माणूस एवढा दारू प्यायला आहे की त्याला सरळ उभं ही राहता येत नाहीय. आणि नशेमध्ये असतानाच तो या पाण्यात गेला आहे. तर दुसऱ्याने, त्याला थंडी वाजत असेल अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “कितीही त्रास असला तरी कृपया असं नका करू, स्वत:च्या जीवाशी खेळू नका”