जगात कोण काय करेल हे सांगता येत नाही. जगभरात संशोधकवृत्तीच्या लोकांची कमतरता नाही याची अनेक उदाहरणं समोर येतात. अशाच एका उदाहरणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हे उदाहरण आहे चक्क कारच्या इंजिनपासून हेलिकॉप्टर बनवण्याचं. हा व्यक्ती केवळ हेलिकॉप्टर बनवून थांबला नाही तर त्याने या हेलिकॉप्टरचं यशस्वी उड्डाणही करून दाखवलं. या उड्डाणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यात एक व्यक्ती मोटारसायकलसारखं वाहन रस्त्यावर आणतो. मात्र, या वाहनाला वरच्या बाजूला मोठे पाते आणि मागच्या बाजूला छोटे पाते असल्याने ते हेलिकॉप्टरप्रमाणे दिसते. सुरुवातीला या वाहनाची पाती फिरू लागतात. नंतर ते वेगाने फिरू लागतात. या नंतर वाहनात बसलेला व्यक्ती ते वाहन सुरू करतो आणि वाहन रस्त्यावर पळायला सुरुवात होते.
पळणारं वाहन हवेत उडालं आणि लोक चकीत झाले
सुरुवातीला हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना हा एखाद्या गाडीपासून हेलिकॉप्टर तयार करण्याचा जुगाड असल्याचं आणि त्याच्या उड्डाणाचे प्रयोग होत असल्याचं वाटतं. मात्र, रस्त्यावर पळणारं हे वाहन पुढे लांब जाते आणि अचानक हवेत उड्डाण घेते. यावेळी हे सर्व पाहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांचे आश्चर्याचा धक्का बसलेले आणि आनंद झालेले संवादही व्हिडीओ ऐकायला मिळतात. वाहनाने हवेत उड्डाण केल्यानंतर हे लोक आनंदाने ओरडताना ऐकायला येते.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : अबब! मगरीने गिळले कुत्र्याला, वाचवण्यासाठी वृद्धाने मारली नदीत उडी; थरारक Video कैमेऱ्यात कैद
सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडीओला तब्बल १६ लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. याशिवाय जवळपास १५ हजार लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला होता. यावर प्रतिक्रियांचा तर पाऊस पडलाय. अनेकजण या शोधाचं भरभरून कौतुक करत आहेत.