Shocking video: तुम्ही सोशल मीडियावर चोरीचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. काही चोर खूप हुशार असतात, पण त्यांचीही चोरी पकडली जाते किंवा कॅमेरात कैद होते. आपल्याला मात्र हे पाहून धक्का बसतो. काही चोर चोरी करण्यासाठी अतिशय विचित्र पद्धती वापरतात. सध्या अशाच एका विचित्र चोरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पैसे, दागिने चोरीला गेल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण शेतातून ऊस चोरीला गेल्याची घटना क्वचितच ऐकली असेल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये चोर इतक्या हुशारीने ऊसावर हात साफ करतात की, पाहून तुम्हालाही संताप येईल. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही बिचाऱ्या शेतकऱ्याची दया येईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक ट्रेन एका ठिकाणी थांबलेली आहे. जर तुम्ही पाहिले तर आजूबाजूचा संपर्ण परिसर हा ऊसाच्या शेताचा आहे. ट्रेन थांबल्यानंतर ट्रेनमधील काही प्रवाशांनी थेट बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतातून ऊस चोरुन आणताना दिसत आहे. कहर तर तेव्हा चोरुन आणत असलेला ऊस ते थेट ट्रेनमधून घेऊन जात आहे. संपूर्ण कारनाम्याचा व्हिडिओ ट्रेनमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बिहारमधला असल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्याचं एवढं नुकसान केल्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. वर्षभर मेहनत घेऊन शेतकरी आपल्या मुलासारखं हे पिक वाढवतो आणि काही लोक अशाप्रकारे नुकसान करतात हे फारच त्रासदायक आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शाळेत नापास झाला चिमुकला, म्हणाला “आधी टेन्शन होतं पण…” मंडळी मजेदार VIDEO चा शेवट अजिबात चुकवू नका

दरम्यान गेल्या काही वर्षांपासून उसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, शेती मशागतीचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी, पाणीपट्टी आदींमुळे उसाचा एकरी खर्च एक लाखाच्या घरात पोहोचला आहे. त्यातच सततच्या अवकाळी पावसामुळे एकरी उत्पादन घटले आहे. त्यामुळे अशा चोऱ्या झाल्या तर शेतकरी कर्जबाजारी होईल.

नेटकरी संतप्त

सोशल मीडियावर हा व्हिडीओ tunmun_pandit_88 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “फारच वाईट, फुकट तिथे प्रकट” तर आणखी एकानं, “अरे त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा तरी विचार करायचा होता” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader