Viral Video: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला अगदी मजेशीर वाटतात, जे आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात एखादी बाब व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण या सोशल मीडियावर रील्स करताना आपण अनेकदा पाहतो. सध्या असाच एक अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक माणूस जगावेगळं करायला निघाला आहे.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

हेही वाचा… ग्राहकांच्या जीवाशी खेळ! मिठाईप्रेमींनो सावधान, तुमची मिठाई उंदीर खातोय; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपलं हसू आवरलंच नाही. या व्हिडीओत एक माणूस काहीतरी वेगळंच करण्याच्या प्रयत्नात दिसतोय. हा माणूस सरकत्या जिन्यांवर (एस्केलेटरवर) चढताना दिसत आहे. पण यामध्ये काय चुकीचं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यात वेगळेपण असं की, खाली उतरणाऱ्या जिन्यावरून हा माणूस वर जाण्याचा प्रयत्न करीत आहे; पण कितीही प्रयत्न करूनही तो सरकत्या जिन्यांवरून वर जाण्यात अपयशीच ठरला

यातील लक्ष वेधून घेणारी आणखी एक गोष्ट म्हणजे या खाली येणाऱ्या सरकत्या जिन्याच्या बाजूला वर जाण्याचा जिनादेखील आहे; पण तरीही हा माणूस आपल्याच धुंदीत खाली उतरणाऱ्या जिन्यांवरून वर जाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. हा माणूस हे मस्करीत करतोय की त्याला खरंच कळत नाहीय हे अजूनही अस्पष्टच आहे.

हा व्हिडीओ @altu.faltu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, याला ‘पॉवर ऑफ देसी’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओला एक लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… काकांनी बेकार हाणला! ट्रेनमध्ये बसलेल्या काकांबरोबर तरुणाने केलं असं काही की, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “कितने तेजस्वी लोग है हमारे यहाँ!” तर दुसऱ्याने कमेंट केली, “स्वॅगच वेगळा आहे.” तर तिसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “जेव्हा तो वर पोहोचेल तेव्हा सांगा.”

दरम्यान, याआधीही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यापूर्वीही दोन महिलांचा एस्केलेटरवर चढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एका रेल्वेस्थानकावर दोन महिला स्वतःसह एका लहान मुलाचा जीव धोक्यात घालताना दिसल्या होत्या.

Story img Loader