Viral video: सोशल मीडियाचं जग इतकं विस्तारलं आहे की, जगाच्या कान्याकोपऱ्यातील गोष्टी आपल्याला मोबाईलवर क्षणात कळतात. कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याचाही नेम नसतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. आपल्या मराठी मंडळींचे आणि एकूण भारतीयांचे एक विशिष्ट लक्षण आहे. ते म्हणजे आपण जरी भारतातून बाहेर आलो, तरी भारतीय संस्कृती काही आपल्यातून बाहेर जात नाही. त्यात कितीही हिंदी गाणी एका मराठी गाण्यांची सर कशालाही नाही. अशाच एका भारतीय महिलेनं थेट दुबईत मराठमोळ्या गाण्यावर डान्स केला आहे. सातासमुद्रापार मराठमोळी संस्कृती जपणाऱ्या महिलेचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.

एका मराठमोळ्या विवाहित महिलेचा ‘नको मला बंगला, नको गाडी पाहिजे…’ या गाण्यावरील रील व्हायरल झाला आहे.नऊवारी साडी नेसलेल्या महिलेने ‘नको मला बंगला, नको गाडी पाहिजे…’ या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे सायली गोडबोले नाव असणाऱ्या इन्स्टाग्राम युजर महिलेने थेट दुबईतील बुर्ज खलीफा खाली एक भन्नाट डान्स केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ‘या महिलेने नऊवारी साडी नेसली आहे.महिलेने दुबईतील रस्त्यावर कोणाला न लाजता मराठमोळ्या लूकमध्ये डान्स केला आहे. या व्हिडिओत या महिलेचा नवरा देखील तिचा डान्स पाहताना दिसत आहे.

Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Dance Viral Video
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Agari Koli womens protest saree giving tradition video viral
“बंद करा, साड्यांचा आहेर बंद करा”, आगरी कोळी समाजातील महिला उतरल्या रस्त्यावर; VIDEO पाहून सांगा तुम्हाला हे पटतं काय
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर ‘या’ चिमुकलीचा Video होतोय तुफान व्हायरल

सोशल मीडियावर आता रोजच नवनव्या गोष्टी व्हायरल होत असतात. इतरांसारखा आपलाही असाच व्हिडिओ व्हायरल व्हावा, अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे अनेक युजर वेगवेगळा प्रयत्न करत असतात. यामुळे अनेकजण वेगवेगळ्या गाण्यांवर रील तयार करत सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

Story img Loader