आयुष्य हे किती क्षणभंगूर आहे याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय. यात एक स्वामी उपस्थितांसमोर प्रवचनात बोलत असतानाच त्यांना ह्रदय विकाराचा (Heart Attack) झटका येतो आणि ते थेट बेशुद्ध पडतात. त्यांचं नाव संत संगना बसवा स्वामी असं सांगितलं जात आहे. ते कर्नाटकमधील बेळगावात बेसगावी येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?

या व्हि़डीओत स्पष्टपणे दिसत आहे की संबंधित स्वामी स्टेजवर खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला इतरही बरेच लोक आहेत. भगवे वस्त्र घातलेले हे स्वामी समोर बसलेल्यांना संबोधन करत आहेत. काही वेळ बोलल्यानंतर त्यांच्या आवाजाची तीव्रता कमी होते. यानंतर काही क्षणातच ते बोलता बोलता स्टेजवरील खुर्चीवर बसलेले असताना बेशुद्ध होतात आणि खुर्चीवर मान टाकतात.

अचानक घडलेला हा सर्व प्रकार पाहून स्टेजवरील सर्व लोक घाबरतात आणि तात्काळ स्वामींना काय झालं आहे हे पाहतात. हा प्रकार पाहून समोर बसलेले श्रोते (अनुयायी) देखील घाबरतात. संबंधित व्हिडीओ रेकॉर्ड करणारा देखील लगेचच आपला मोबाईल खाली घेतो आणि व्हिडीओ इथंच थांबतो.

तातडीने रुग्णालयात हलवलं, मात्र…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत संत संगना बसवा स्वामी बोलता बोलताच बेशुद्ध होतात आणि स्टेजवरील सर्व लोक त्यांच्या अवतीभोवती गराडा घालतात. पुढे हा व्हि़डीओ बंद होतो. यानंतर उपस्थितांनी या स्वामींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

हेही वाचा : World Heart Day 2021: जास्त घाम येणे, छातीत दुखणे..हृदयरोगाची ‘ही’ आहेत लक्षणं

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांच्या मनाला चटका लागला. सर्वच स्तरातून या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली जातेय. अनेक लोक आयुष्य किती क्षणभंगूर आहे यावरही बोलत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of a priest died due to heart attack on stage while talking in belgaum karnataka pbs