पक्ष्यांचे वेगवेगळे व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. पण कधी स्मोकिंग करणारा पक्षी कधी पाहिला आहे का? सध्या अशाच एका पक्ष्याची चर्चा जोरात सुरूये. या पक्ष्याला सिगारेट ओढण्याचं व्यसन लागलंय आणि अगदी हूबेहूब माणसासारखं तो स्मोकिंग करताना दिसतोय. निसर्गात अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत, ज्यापर्यंत आजही वैज्ञानिक पोहोचू शकलेले नाहीत. आश्चर्य म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नाही. असाच हा व्हिडीओ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पक्ष्याच्या तोंडातून धूर निघताना दिसतो. पक्ष्याकडे पाहिल्यावर असं दिसतं की तो तो स्मोकिंग करतोय. हा पक्षी ‘स्मोकिंग बर्ड’ म्हणून ओळखला जातो. मात्र, व्हिडीओबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, हा एक विशेष प्रकारचा पक्षी आहे. ज्यामुळे अशी लक्षणे उद्भवू शकतात.

व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या पक्ष्याचे चित्र पाहून शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे की, हे बेयर- थ्रोटेड बेलबर्ड्स पक्षी आहेत. यातील नर बर्फासारखे पांढरे असतात. त्यांचे चेहरे हिरवट-निळे असतात. तर मादींचा चेहरा ऑलिव्ह हिरव्या रंगाचा असतो. मानेवर पट्टे असतो. या व्हिडीओमध्ये दिसणारा पक्षी नर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ते केवळ दक्षिण अमेरिकेतील अटलांटिक वर्षावनांमध्ये आढळतात.

हा व्हिडीओ रेल्वे अधिकारी अनंत रुपनगुडी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ते IRAS अधिकारी आहे. रुपनागुडी सध्या चेन्नईमध्ये डीआरएम म्हणून तैनात आहेत. त्यांनी व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले, “लोकप्रिय रूपात या पक्ष्याला स्मोकिंग बर्ड म्हटलं जातं. इतकं सौंदर्य! आश्चर्य वाटते की याला प्रत्यक्षात काय म्हणतात!”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कोमोडो ड्रॅगनने कासवाची केली शिकार, त्याचे कवच टोपीसारखं घालून फिरू लागला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Same to same! जुळ्या बहिणींचा नवराही एक आणि आता प्रेग्नेंसीबाबत काय म्हणतात? वाचा…

या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख ८१ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये हिरवट-निळ्या डोके आणि मानेचा पांढरा पक्षी धुराचे लोट बाहेर काढण्यापूर्वी शिट्टीचा आवाज करण्यासाठी अनेक वेळा तोंड उघडताना दिसतोय.