Viral video: सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे अगदी मजेशीर असतात. तर अनेकदा असे व्हिडीओ असतात जे पाहून समोरचा तो व्हिडीओ सारखा सारखा पाहतो. सोशल मीडियामुळे देशातल्या कानाकोपऱ्यात असलेलं टॅलेंट जगाच्या समोर येत आहे. आपली आवड जोपासत अनेक जण दर दिवशी असंख्य व्हिडिओ शेअर करत असतात. त्यातले काही निवडक व्हिडिओ नेटिझन्सच्या पसंतीला उतरतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर शाळेचे सुद्धा अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. शाळेतील हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा आपल्याला सुद्धा बालपण आठवते, शाळेचे जुने दिवस आठवते. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मराठी शाळेतील विद्यार्थीनीची अनोखी कला दिसून येईल. ज्यात तिने अतिशय सुरेख आवाजात गाणं गायलं आहे.
शाळा सुरु झाल्या की विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण येते. शाळेत तास, होमवर्क आणि शिकवणी यामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण हारवत चालले आहे. परंतु काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवणारे शिक्षक असतात. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात.त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी ही मुलं नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात. ज्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करताना दिसतात, तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलीनं ज्याप्रकारे गाणं गायलंय ते ऐकून तिचे शिक्षकही अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ पाहाताना चुमच्याही अंगावर शहारे येतील इतकं सुंदर तिनं गायलं आहे.
“कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे…कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे” हे मराठी गाणं या तरुणीनं गायलं आहे. हे गाणं ऐकताना तुम्हीही हरवून जालं. ग्रामीण भागात जिथे बऱ्याच ठिकाणी भौतिक साधन सुविधा नाहीत, अशा ठिकाणी असा हिरा सापडणं आणि त्याची पारख होणं अवघड आहे. परंतू एका शिक्षकानं या विद्यार्थीनीमधलं हे अप्रतिम टॅलेंट ओळखलं. सोशल मीडियावरदेखील या व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. ज्याने अख्ख्या महाराष्ट्राल वेड लावलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
शाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. हल्ली सोशल मीडियावर गावाकडच्या शाळांमधील अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात.