सोशल मीडियावर नानाविध प्रकारचे व्हिडिओ शेअर होत असतात. काही हासवतात तर काहींना पाहून डोळे देखील पाणावतात. मात्र, एका व्हिडिओतून तुम्हाला प्रेरणा मिळेल, तसेच मैत्रीचे अर्थही कळेल. आयपीएस ऑफिसर दिपांशू काबरा यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, त्यात भूकंप आल्यावर एका विद्यार्थ्याने आपल्या मित्राची साथ सोडली नसल्याचे दिसून येत आहे.

व्हिडिओ एका वर्गाचा आहे. त्यात विद्यार्थी बसलेले आहेत. भूकंप आल्यावर हे विद्यार्थी पळत असल्याचे दिसून येत असून मागे एक जखमी विद्यार्थी सुटतो. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे वर्गाबाहेर एकटेच न निघता एक विद्यार्थी या जखमी विद्यार्थ्यालाही वर्गाबाहेर सुरक्षित स्थळी नेत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्याने मागे राहिलेल्या जखमी विद्यार्थ्याला आपल्या खांद्यावर बसून वर्गाबाहेर काढून संकटात त्याची मदत केली आहे.

(Viral : गाढवाशी बोलू पाहतोय व्यक्ती, सुरुवातीला केवळ मान हालवली, नंतर दिली जोरदार प्रतिक्रिया, पाहा मजेदार व्हिडिओ)

दिपांशू काब्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना कुठली आहे हे कळू शकले नाही. एका वर्गातील सीसीटीव्ही फुटेजमधून ही घटना पुढे आली आहे. एका मित्राने दुसऱ्या मित्राला संकटातून बाहेर काढत माणूसकीचे दर्शन दिले आहे. हा व्हिडिओ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

नेटकऱ्यांनी केले कौतुक

आयपीएस दिपांशू काब्रा यांनी व्हिडिओतील विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे. कठीण काळात स्वत:ला विसरून इतरांना साथ देणे हिच खरी मैत्री असल्याचे पोस्टमध्ये लिहित त्यांनी विद्यार्थ्याची प्रशंसा केले. यावर इतर युजर्सनीही कमेट केले आहे. एकाने ‘ओन्ली अ मेन कॅन डू धिस’ असे म्हणत कौतुक केले आहे तर एकाने खऱ्या मैत्रीशिवाय काहीही मोठे नाही, असे मत व्यक्त केले आहे.

(हेअर ड्रायर वापरताना न्हाव्यासोबत जे भयानक घडले ते पाहून तुमच्या अंगावर येईल काटा, पाहा व्हिडिओ)

Story img Loader