Viral Video of teacher slapping minor student causes ear bleeding: विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं गुरू-शिष्याप्रमाणे असतं. विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून होणाऱ्या चुका योग्य त्या पद्धतीने दाखवून शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कारच करीत असतात. पण, अनेकदा शिक्षक विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यापेक्षा शिक्षेचा मार्ग निवडतात. या शिक्षेमध्ये अनेकदा मुलांना शारीरिक किंवा मानसिक त्रासातून जावं लागतं. आता अशीच एक घटना तेलंगणात घडली आहे, जिथे शिक्षकाने विद्यार्थिनीला कानातून रक्त येईपर्यंत मारलं.

तेलंगणातील जगतियाल येथे एका विद्यार्थिनीला शाळेत गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे क्रूर शिक्षा देण्यात आली. शिक्षकानं इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या कानावर एवढा जोरात मारलं की, तिच्या कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला.

Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
school Teacher misbehaved with girls
रत्नागिरी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत शिक्षकाला केले निलंबित
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण

हेही वाचा… रक्षाबंधनासाठी निघालेल्या ताईने बसमध्येच दिला आपल्या लेकराला जन्म; महिला कंडक्टर अन् नर्सने केली ‘अशी’ मदत

तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील जगतियाल ब्लॉकमध्ये असलेल्या एमपीपीएस टीआर नगर शाळेत ही घटना घडली. शाळा एका स्थानिक संस्थेद्वारे चालवली जाते आणि ती ग्रामीण भागात आहे. सरकारी शाळेतील शिक्षकानं दुसरीत शिकणाऱ्या मुलीला तिच्या कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होईपर्यंत मारलं. कुमार असं या शिक्षकाचं नाव असून, गृहपाठ न केल्यानं शिक्षकानं या मुलीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

या व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगी तिचं पुस्तक दाखवत आहे. मुलीच्या कानावर मारल्यामुळे रक्तस्राव झाला आणि ते रक्त पुस्तकावर पडलं. शिक्षकानं केलेल्या अमानुष मारहाणीमुळे गंभीर दुखापत झालेल्या मुलीचा कानही दुसऱ्या शिक्षकानं या व्हिडीओत दाखवला आहे. तसेच मुलीच्या कपड्यावर आणि आयडी कार्डवरही रक्ताचे डाग होते, जे शाळेतील दुसऱ्या शिक्षकानं या व्हिडीओमध्ये दाखवले.

हा व्हिडीओ ‘Telugu Scribe’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली असून, इंटरनेटवर शिक्षकाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. लहान मुलाला अशी भयानक शिक्षा देण्याच्या या क्रूर कृत्याबद्दल इंटरनेट वापरकर्त्यांनी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ बुधवारी (२१ ऑगस्ट) रोजी इंटरनेटवर शेअर करण्यात आला आणि आता तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या प्रकरणी शिक्षकावर कोणतीही कारवाई झाल्याचं वृत्त नाही. विद्यार्थ्यांना मारहाण करण्याची परवानगी शिक्षकांना नसल्यानं जबाबदार शिक्षकावर कठोर आणि जलद कारवाई करण्यात यावी, असं संतप्त नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

Story img Loader