Viral Video of woman climbs on a car: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनेक अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात फक्त प्रसिद्धी मिळावी किंवा मजेसाठी लोकं आपल्या जीवाशी खेळून रील बनवतात. कधी समुद्रकिनारी, तर कधी उंच डोंगरावर, कधी धबधब्याजवळ तर कधी भररस्त्यात लोकं रील शूट करत असतात. परंतु, या सगळ्यात ते आजूबाजूचं भान गमावून बसतात आणि आपला जीव धोक्यात घालतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रील करण्याच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावला आहे, अशा बातम्या आपण अनेकदा पाहतो; परंतु तरीही काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपली मर्यादा ओलांडू लागले आहेत. विचित्र स्टंट करून आपला जीव धोक्यात टाकू लागले आहेत. आता अशाचप्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी कारवर चढते आणि तिचा पाय काचेवर पडताच काच तुटते आणि ती खाली कोसळते.

हेही वाचा… रील्ससाठी कायपण! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तरुणीने केला डान्स, VIDEOतून पाहा किळसवाणा प्रकार

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दोन महिला एका कारवर चढताना दिसत आहेत. यातली एक महिला कारच्या पुढील बाजूने कारच्या रुफवर चढते, तर दुसरी महिला तिच्या मागून कारच्या रुफवर चढत असते. चढता चढता दुसरी महिला कारच्या पुढच्या काचेवर (Front windshield) उभी राहते. तेवढ्यात त्या काचेवर प्रेशर आल्याने काच फुटते आणि त्या महिलेचा पाया काचेतून आत जातो आणि अपघात होतो.

काचेत पाय अडकल्याने महिला स्वत:ला त्या परिस्थितीतून बाहेर काढते आणि कारवरून खाली उतरते. या अपघातात तिला जखम झाल्याचं दिसून येतंय. कारवरून उतरल्यानंतर महिलेला नीट चालताही येत नव्हतं.

https://www.instagram.com/reel/C5hu_1JNnUd/

व्हायरल झालेला हा व्हिडीओ ‘laughwith_mm19’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “जेव्हा आपण रील तयार करता परंतु दुर्दैवाने…” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल २० मिलियन व्ह्यूज आले आहेत. तर १,७१,४८१ जणांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया (Users Comments)

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “मला हसायला नाही आलं, पण तिला पाहून असं वाटतंय की, तिला खूप जास्त लागलं असणार”; तर दुसऱ्याने “हे खूप धोकादायक आहे”, अशी कमेंट केली. तर एक जण संतप्त होत म्हणाला, “हे असे धोकादायक स्टंट करायच्या वेळेस यांचं डोकं काम करत नाही का?” अनेकांनी यावर इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of a woman climbs on a car and the glass breaks causing an accident dvr