Viral Video of a woman dancing in a garbage dump: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असताना आपण पाहतो. या व्हायरल झालेल्या व्हिडीओंमुळे स्वत:ला रील स्टार किंवा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणवणाऱ्या काही लोकांचं जरा जास्तच फावलं आहे, असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. या व्हिडीओंमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा लोक गैरवापर करू लागले आहेत.

काही लाइक्स आणि व्ह्युजसाठी हे रील स्टार किळसवाणा प्रकार करून आता हद्द पार करू लागले आहेत. अशा प्रकारचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जिथे एक कन्टेन्ट क्रिएटर चक्क कचराकुंडीजवळ डान्स करताना दिसतेय.

Viral Video Of Village
‘अजून एक लाडू बावासाठी… ‘ तुम्ही कधी पंगतीत जेवायला बसला आहात का? मग पाहा गावकडचा ‘हा’ VIRAL VIDEO
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Viral video rickshaw driver writes interesting question on backside of rickshaw viral
VIDEO: पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? कोल्हापुरच्या रिक्षा चालकानं लिहलं भन्नाट उत्तर; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Farmer desi jugaad video farmer jugaad to protect maize field from pig goes viral watch video
शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय; डुक्करांपासून संरक्षण करण्यासाठी ढासू जुगाड; Video एकदा पाहाच
Golgappa Vendors Arrested For Kneading Dough With Feet, Mixing Harpic 'For Taste' shocking video
पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पायाने पीठ मळून घेतले आणि नंतर टॉयलेट क्लिनर मिसळले; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Ukhana video by aaji old lady social viral ukhana funny video goes viral
“मळ्याच्या मळ्यात होतं निंबोनीचं झाड…” आजीबाईचा सैराट स्टाईल गावरान उखाणा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Python attack viral vide | Pythons rescue video| Python shocking video
विहिरीत अडकलेल्या महाकाय अजगरांच्या रेस्क्यूचा थरार; शेपटीला पकडून ओढणार इतक्यात घडले असे काही की…; धडकी भरवणारा VIDEO
young boy dance obscenely in front of mother
बापरे! आईसमोर अश्लील डान्स करणं पडलं महागात; गावासमोर दिला बेदम चोप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “याची मस्ती…”

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मुंबईतील एक कन्टेन्ट क्रिएटर भरपावसात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ डान्स करताना दिसतेय. सीमा कनोजिया असे या रील बनवणाऱ्या तरुणीचे नाव असून, ती ‘आयेगा मजा अब बरसात का’ या गाण्यावर थिरकली आहे. गलिच्छ परिसरात डान्स करता करता ती पावसाच्या पाण्यातदेखील भिजत आहे.

हेही वाचा… हेच ते आप्पा! ‘आप्पाचा विषय लई हार्ड ए’ गाण्यातील आप्पा अखेर सापडलेच, आजोंबाचा स्वॅग पाहून तुम्हालाही बसेल धक्का

रेन डान्ससारखा अनुभव घेण्यासाठी सीमाने हिरवीगार बाग किंवा नयनरम्य ठिकाण न निवडता, कचरा असलेल्या डंपयार्डसारख्या जागेवर डान्स करून सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. विचित्र प्रकारे डान्स करण्याचा या तरुणीचा हा पहिलाच प्रयत्न नसून, याआधीही तिने अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करीत रील शूट केली आहे.

हेही वाचा… “पोलिसवाल्या सायकलवाल्या…”, साडी नेसून, गणवेश घालून चिमुकल्यांनी केला असा डान्स की… VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

रेल्वेस्थानकावर मेट्रो वा ट्रेनमध्ये एवढेच नव्हे, तर अगदी विमानतळावरदेखील तिनं अशा प्रकारचा डान्स केला आहे. आता हद्द पार करीत या तरुणीनं चक्क कचराकुंडीजवळ रील शूट केली आहे.

युजर्सची प्रतिक्रिया

तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून प्रतिसाद दिला आहे. एकानं कमेंट करीत लिहिलं, “आता अगदी योग्य जागेवर डान्स करते आहे.” दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “इथे उभं राहण्याची कोणाची इच्छा होणार नाही, हिने तर डान्स केला आहे.” तर एक जण म्हणाला, “हिला पागलखान्यात पाठवा.”

दरम्यान, हा व्हिडीओ ‘seemakanojiya87’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला २लाख ९० हजार व्ह्युज आले आहेत. सीमा कनोजिया ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि असे विचित्र व्हिडीओ शेअर करते. सीमाचे सोशल मीडियावर तब्बल ७ लाख ५९ हजार फॉलोअर्स आहेत.