सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असताना आपण पाहतो. या व्हायरल झालेल्या व्हिडीओंमुळे स्वत:ला रील स्टार किंवा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणवणाऱ्या काही लोकांचं जरा जास्तच फावलं आहे, असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. या व्हिडीओंमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा लोक गैरवापर करू लागले आहेत.
काही लाइक्स आणि व्ह्युजसाठी हे रील स्टार किळसवाणा प्रकार करून आता हद्द पार करू लागले आहेत. अशा प्रकारचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जिथे एक महिला चक्क फाटलेल्या कपड्यांमध्ये रील बनवताना दिसतेय.
हेही वाचा… “याला म्हणतात ३६ चे ३६ गुण जुळणे”, नवरदेव आणि नवरीचा वरातीत भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
महिलेचा अश्लील डान्स व्हायरल
महिलेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही संतप्त व्हाल. या व्हिडीओमध्ये महिलेने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हद्दच पार केली आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, महिलेने कुर्ती आणि फाटलेली लेगिंग परिधान केलीय. रीलची शूटिंग सुरू करताच ही महिला कॅमेरासमोर उलटी उभी राहते आणि तिची फाटलेली लेगिंग्ज दाखवते. फक्त प्रसिद्धीसाठी महिलेने हा स्टंट केल्याचं दिसतंय. असा प्रकार करत ती या व्हिडीओमध्ये उड्या मारत डान्स करतानादेखील दिसतेय.
व्हिडीओची लिंक
https://www.instagram.com/p/DEcx4qZzPZT
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @hasimkhan396 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून कौन कौन चाहता है इन्स्टाग्राम बंद हो जाये, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच याला तब्बल १३. ३ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया
महिलेचा असा अश्लील व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “प्रसिद्ध होण्यासाठी माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो” तर दुसऱ्याने “अगं जरातरी लाज बाळग” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “उंदराने हिचे कपडे चावले आहेत वाटतं.”