सोशल मीडियावर सतत विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. या व्हिडीओंमधील कधी काही हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर कधी प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्यूज मिळवतात.

माणसांचं आणि श्वानांचं नातं अगदी खास असतं. निष्ठावंत प्राणी म्हणून श्वानाची ओळख आहे. तसंच श्वानांचं पालकत्व स्वीकारलेली लोकंही त्यांना खूप जीव लावतात. त्यांच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात.

जितकं माणसं श्वानांवर प्रेम करतात त्याच्या दुप्पट श्वानांचं माणसांवर प्रेम असतं आणि ते त्यांच्या कृतीतून नेहमी कळून येतं. श्वान आपल्या माणसांसाठी हवं ते करायला तयार असतात. अगदी आपला जीव गेला तरी ते मागे पुढे पाहत नाहीत, म्हणूनच श्वानाला प्रामाणिक प्राणी अशी उपमा मिळते.

पालकांचं आणि प्राण्यांचं प्रेम दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा आणि तिच्या श्वानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं व्हिडीओमध्ये काय आहे ते जाणून घेऊ या…

महिलेच्या पिशवीत छोटा साथीदार

सोशल मीडियावर सध्या एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला बसमधून प्रवास करताना दिसतेय. पण या बसमध्ये तिच्याबरोबर एक खास साथीदारदेखील आहे. ही महिला बसमधून प्रवास करत असताना तिच्याजवळ एक पिशवी असते आणि या पिशवीत एक श्वानाच्या पिल्लू असतं. एवढ्या गर्दीतही अगदी सांभाळून ती महिला त्या श्वानाच्या पिल्लाला घेऊन जाताना दिसतेय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @dog_lovar_8600 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “निस्वार्थ प्रेम, गावाकडली माणसं” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. महिलेचा आणि श्वानाच्या पिल्लाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच याला १ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूपचं आवडला व्हिडिओ” तर दुसऱ्याने “असं प्रेम पाहिजे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “आज काल लोक माणसांना पण एवढं जपत नाहीत”

Story img Loader