मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’, असं म्हणत मुंबई लोकलमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या असंख्य माणसांची दर दिवशी गर्दी पाहायला मिळते.
यात उशीर झाला म्हणून चालती ट्रेन पकडणारे प्रवासीही अनेक असतात. अशात ज्यांना चालती ट्रेन कशी पकडायची हेच माहीत नसतं आणि दुसऱ्यांना बघून स्वत:पण असलं काहीतरी करायला जातात आणि स्वत:वर संकट ओढवून घेतात, अशी माणसंही अनेक आहेत. सध्या अशाच माणसाचं उत्तम उदाहरण असणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण चालत्या ट्रेनमधून उतरताना दिसतोय. पण, या नादात त्याचा तोल जातो आणि तो खालीच पडतो.
हेही वाचा… बापरे! दोघे आले अन् त्याला…, पेट्रोल पंपावर झालं असं काही की VIDEO पाहून बसेल धक्का
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस चालत्या ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात असताना दिसत आहे. उतरता उतरता त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. प्लॅटफॉर्मवर पडल्यानंतर तो लगेच उठून बसतो. आजूबाजूला जमलेल्या माणसांचं या घटनेनं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ ट्रेनमधीलच एका प्रवाशानं रेकॉर्ड केला आहे.
हा व्हिडीओ @unseen.mumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, “कृपया हे कोणीही ट्राय नका करू” अशी कॅप्शन त्याला दिली आहे. या व्हिडीओला ५९ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
हेही वाचा… “जरा तरी लाज…”, मंदिरात बसलेल्या महिलेच्या गळ्यात खिडकीतून टाकला हात अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “नया है वह.” तर दुसऱ्याने कमेंट करीत लिहिलं, “त्या माणसाला उचलायचं सोडून, आधी व्हिडीओ बनवला.”
हेही वाचा… भररस्त्यात कपलने काय केलं पाहा! गाड्या थांबल्या तरी भान नाही, पाहा VIDEO
दरम्यान, याआधी ट्रेनमधील अशा प्रकारचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.