Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातायत. काही लाइक्ससाठी थिल्लरपणा, किळसवाणे प्रकार, धोकादायक कृत्य करून स्वत:ला इन्फ्लूएन्सर म्हणवणाऱ्या या लोकांची हिंमत वाढतच चाललीय. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक तरुण रेल्वे रुळांवर धोकादायक स्टंट करताना दिसतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक तरुण रेल्वे अपघात घडविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. व्हिडीओ सुरू होताच आपण पाहू शकतो की, हा तरुण रेल्वे रुळांवर सायकल ठेवताना दिसत आहे. नंतर त्यावर काही दगड, तर काही वेळाने चक्क लहान गॅस सिलिंडरदेखील रुळांवर ठेवलेला दिसत आहे. इथपर्यंत दिसणाऱ्या गोष्टी धक्कादायक तर होत्याच; पण त्यानंतर त्याने जे केले, ते पाहून नक्कीच सगळ्यांनाच धक्का बसेल.

हेही वाचा… हीच खरी माणुसकी! पावसाच्या पाण्यात बुडणाऱ्या श्वानाची मृत्यूच्या दारातून सुटका; VIRAL VIDEO पाहून कराल कौतुक

रेल्वे रुळांवर अनेक गोष्टी ठेवल्यानंतर आता या तरुणाची मजल चक्क जिवंत कोंबडा ठेवेपर्यंत गेली. या तरुणाने रेल्वे रुळांवर शेवटी जिवंत कोंबडा बांधला आणि ट्रेनची वाट पाहत तो थांबला. सोशल मीडियाच्या अनेक अकाउंट्सवरून हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

याआधीही त्याने असा धोकादायक प्रकार केला आहे. हा तरुण यूट्यूबर असून, त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर अशा प्रकारचे अनेक उपद्रवी व्हिडीओ शेअर केले आहेत.

‘Trains of India’ या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “हा लाल गोपालगंज, यूपी येथील मिस्टर गुलजार शेख आहे; जो यूट्यूबद्वारे पैसे मिळविण्यासाठी रेल्वे रुळांवर घातक गोष्टी ठेवतो आहे आणि १००० प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहे. त्याच्यावर कडक कारवाई करावी”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

युजर्सचा संताप (Users Comments)

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर संतापजनक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिलं, “हा दहशतवादी आहे, त्याला NSA अंतर्गत अटक करावी.” तर दुसऱ्याने कमेंट करीत लिहिलं, “फक्त काही लाइक्स आणि पैशांसाठी स्वत:बरोबरच मुक्या प्राण्यांचा जीव धोक्यात घालत आहे हा. लज्जास्पद आहे हे सगळं.” एक जण, “त्याला आधीच अटक झाली पाहिजे होती”, असंही म्हणाला.