Viral Video : पावसाळ्यात बाहेरची पाणीपुरी खाऊ नये असे म्हणतात. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर पावसाळ्यात बाहेरची पाणीपुरी खाल्ल्याने आजारी पडण्याचा धोका असतो पण अनेकदा पाणीपुरी खाण्याचा मोह आवरता येत नाही. यावर उपाय म्हणून तुम्ही घरीच पाणीपुरी बनवून खाऊ शकता.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला लहान मुले घरीच पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे आजी त्यांना पाणी पुरी सर्व्ह करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मुले आणि एक मुलगी खाली बसून घरीच पाणीपुरीचा आस्वाद घेत आहे आणि विशेष म्हणजे आजीच त्यांना पाणीपुरी सर्व्ह करताना दिसत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

veer_kashyap002 या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आजीबरोबर पाणीपुरी”

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पावसाळ्यात घरीच पाणीपुरी खातानाचा हा व्हिडीओ अनेक युजर्सच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्स पाऊस पाडला आहे. पाणीपुरी लव्हर्सनी तर यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “हा व्हिडीओ पाहून मला माझ्या बालपणीची आठवण आली” तर एका युजरने लिहिले, “हे आईचे प्रेम आहे”

Story img Loader