सध्या इंटरनेटवर इन्स्टाग्राम रिल्सनं धुमाकूळ घातला आहे. आज जगभरातील कित्येक लोकं Instgram Reels वरून स्टार झाले आहेत. कोण डान्स करतंय, तर कोण ॲक्टिंग! दिवसाला शेकडो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर आपल्याला पहायला मिळतात. अशा प्रकारचे दर्जेदार आणि मजेदार व्हिडीओ झटपट व्हायरल होत असतात. अशातच एका फिरंगी पठ्यानं ‘रिंकिया के पापा’ भोजपुरी गाण्यावर नाचून कमाल केली आहे. त्याचा हा डान्स व्हिडीओ एकदा पाहिलात की फक्त पाहतच रहाल, हे मात्र नक्की.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये राहणारा रिकी पॉंड हा इंस्टाग्रामवरचा स्टार आहे! हा स्टार अमेरिकेचा असला तर भारतीय सुद्धा त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते झाले आहेत. त्याचे सर्व व्हिडीओ मोठ्या आवडीने पाहतात. गाणी बॉलीवूडमधील असोत किंवा मग भोजपुरी, माहौस कसा रंगवायचा हे रिकीला चांगलंच माहीत आहे. इतकंच नाही तर तो तमिळ, मल्याळम, पंजाबी भाषेतील गाण्यांवर सुद्धा डान्सही करतो. ‘डान्सिंग डॅड’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या रिकीने ७ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आणि तो त्वरीत व्हायरल झाला. कारण या क्लिपमध्ये तो मनोज तिवारीच्या ‘रिंकिया के पापा…’ या प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसत आहे.

आणखी वाचा : DiCaprio Tree: हॉलिवूडचा सुपरस्टार लिओनार्डो डि कॅप्रिओच्या नावाचं झाड! आफ्रिकामधली एक अद्भुत वनस्पती

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लॉटरी जिंकल्यानंतर आजीबाईने दुकानदाराला दिले पैसे, एका दिवसात ६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

हा व्हिडीओ ricky.pond नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर त्याचा नवीन डान्स व्हिडीओ शेअर करताना, रिकी पॉन्डने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एम्मा, डॅलिन, ऑड्रे, गॅरेटचे पापा.” ही बातमी लिहिपर्यंत या क्लिपला ८ हजारांहून अधिक लाईक्स आणि ९५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच युजर्सही यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : OMG! मार्केटमध्ये शॉपिंग करताना अचानक साप दिसला आणि…पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

या व्हिडीओमध्ये तो फनी एक्सप्रेशन देण्यासोबतच लिपसिंकही करत आहे. त्याने हा व्हिडीओ पोस्ट करताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा नवा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. या व्हिडीओखालचा कमेंस सेक्शन वेगवेगळ्या कमेंट्सनी भरलं आहे. काहींनी लिहिले की “अरे.. अरे… रिंकिया के पापा”. तर काहींनी गंमतीने अनेक कमेंट्स शेअर केले आहेत. तर काहींनी या अमेरिकन पठ्ठ्याच्या डान्सचं कौतुक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of american man who dance on rinkiya ke papa bhojpuri song manoj tiwari watch this video prp