दिल्ली, मुंबई आणि लगतच्या भागात पाऊस पडत आहे. त्यात हिवाळा ऋतू सुरु आहे. वीकेंड कर्फ्यू लागू आहे. अशा परिस्थितीत लोक बहुतेक घरात असतात. दरम्यान भारतीय लष्कराच्या जवानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जवान या थंडीला, बर्फवृष्टीला न घाबरता खंबीरपणे तोंड देत उभा आहे.
संरक्षण मंत्रालयाने पोस्ट केला व्हिडीओ
संरक्षण मंत्रालयाच्या पीआरओ उदमपूरच्या पेजवर हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक जवान त्याच्या पोस्टवर तैनात असल्याचे दिसत आहे. खूप झाली आहे. वारा वाहत आहे, तरुण माणूस गुडघाभर बर्फात आहे. हा व्हिडीओ काश्मीर बॉर्डरचा आहे. हा व्हिडीओ लिहिपर्यंत या व्हिडीओला २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
(हे ही वाचा: Photos: पार्ले-जी मधील ‘जी’ चा नेमका अर्थ तुम्हाला माहीत आहे का?)
नेटीझन्स भावूक
(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)
(हे ही वाचा: राष्ट्रप्रेम! ८००० फूट उंचीवर गायलं ‘माँ तुझे सलाम’ गाणं; व्हिडीओ होतोय Viral)
या व्हिडीओने लोकांना भावूक केले. देशाचे आणि देशवासीयांचे क्षणोक्षणी संरक्षण केल्याबद्दल युजर्सनी सैनिकांचे आभार मानले.
(हे ही वाचा: चालत्या ट्रेनच्या डब्याच्या बाहेर कपलिंगवर बसून दोन व्यक्तीने केला प्रवास; Video Viral)
देशाच्या रक्षणासाठी जवानांना लोकांनी नतमस्तक केले आणि कठीण परिस्थितीत उभे राहिल्याबद्दल त्यांना सलाम केला.
भारतीय लष्कराच्या जवानाचा हा व्हिडीओ पाहून तुमची प्रतिक्रिया काय आहे?