लग्नासाठी योग्य जोडीदार मिळण्यापासून तो संसार टिकण्यापर्यंत अनेक समस्या सध्या भारतीय समाजात दिसतात. काहींची लग्न होतात पण त्यांचे घटस्फोटही तितकेच लवकर होतात. लग्न झाल्यानंतर नवीन नवीनच प्रेम असतं, नंतर एकमेकांचा कंटाळा येऊ लागतो, असंही आपण अनेकदा विवाहित जोडप्याकडून ऐकत आला असाल. पण अशाच वातावरणात सध्या एक व्हिडीओ नव्या पिढीतील प्रेमी युगुलांना आणि नवविवाहितांना खऱ्या प्रेमाची व्याख्या करून देत आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलंत. सोशल मीडियावर सध्या एक आजी-आजोबांच्या कपलचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, याला म्हणतात खरं प्रेम!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकत्र रस्ता ओलांडताना या आजी आजोबांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सर्वांनाच प्रेमाचं खरं रूप दाखवत आहेत. हल्ली लग्न जास्त काळ टिकत नाही, घटस्फोटाचेही प्रमाण वाढू लागले आहेत. हल्लीची तरूणाई तर प्रेमाला खेळणं समजून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात आणि मग काही महिन्यानंतर आपल्या जोडीदारासोबत ब्रेकअप करतात. पण यापलिकडे जाऊन प्रेमाचं खरं रूप दाखवणारा हा व्हिडीओ सर्वांनाच आवडू लागलाय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पॅराशूटला विमान लटकवत जमिनीवर उतरवून पायलटने आपला जीव वाचवला!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पावसात एक आजी आजोबा एकत्र एका छत्रीत फिरताना दिसून येत आहेत. छायाचित्रकार आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आसिफ खान यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आजोबांनी आपल्या हातात छत्री पकडलेली दिसत आहे. तर आजी आजोबांसोबत हळुहळू रस्ता क्रॉस करताना दिसत आहे. आजी पावसात भिजू नये म्हणून आजोबांनी आजीकडे छत्री वळवलेली दिसत आहे.

आणखी वाचा : अख्खा रस्ता खचून गाडी खड्ड्यात पडली, धक्कादायक VIRAL VIDEO पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL : ५० वर्षांच्या मेहनतीने मिळवलेली ६०० कोटींची संपत्ती गरीबांना केली दान, राहण्यासाठी फक्त घर उरले

या व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला २६ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. जिथे कशाचीही खात्री देत येत नाही अशा जगात प्रेमाची खात्री असणे हे मंत्रमुग्ध करणारे नाही का? अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी खऱ्या प्रेमावर आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. अनेक युजर्स तर हार्ट इमोजी आणि लव्ह-स्ट्रक इमोजी शेअर करू लागले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of an old couple crossing the road together will make you believe in eternal love prp