एकीचे बळ काय असते, हे लहानपणापासून आपण शिकत आलो आहोत. लहानपणी तुम्ही कथा ऐकली असेल. असाच एक प्रेरणादायी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इवल्याश्या मुंग्या पण सगळ्या मिळून त्या चक्क काठी हलवताना दिसत आहेत. लहानशी वाटणारी मुंगी साधारणपणे साखरेचा रव्याचा दाणा घेऊन जातांना साऱ्यांनीच पाहिलं असेल. पण जर हीच मुंगी खाद्यपदार्थ सोडून थेट काठी लंपास करु लागली हे ऐकलं तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का? अर्थात नाहीच. पण हे खरंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही मुंग्या एक मोठी काठी एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवताना दिसत आहेत. या मुंग्यांच्या १०० पट आकाराची काठी सहज हलवली गेली. कारण या मुंग्यांनी एकत्रित प्रयत्न केले. या व्हिडीओमध्ये मुंग्या एक आइस्क्रीमच्या काठी हलवताना दिसत आहेत. केवळ एका मुंगीसाठी हे अशक्य काम झाले असते, पण एकत्रित प्रयत्नांमुळे हे सोपे काम झाले. हा केवळ व्हिडीओ नाही. कारण यात प्रत्येकासाठी एक महत्त्वाचा धडा आहे. व्हिडीओमधून एकतेचे बळ किती महत्त्त्वाचे आहे, हा संदेश देण्यात आला आहे.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Elephant charges at man after persistent teasing
Viral Video : तरुणाने काढली हत्तीची छेड, संतापलेला हत्ती अंगावर आला धावून…पाहा पुढे काय घडले!
Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अमेरिकेची सर्वात मोठी स्लाइड मुलांना हवेत फेकत होती, सुरू होऊन चार तास बंद करावी लागली

हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अद्भुत गोष्ट लिहिली आहे. ‘आम्ही एकजुटीने पर्वतही हलवू शकतो’ असं कॅप्शनमध्ये लिहून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. #PowerOfUnity” हा हॅशटॅगही जोडण्यात आलाय.

आणखी वाचा : मेट्रोत चिमुकलीचा GOMI-GOMI गाण्यावर जबरदस्त डान्स, VIRAL VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘मागे वळून तर पाहा’

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मेंढ्यांसारखे ‘बा-बा’ करणाऱ्या माणसांचा VIDEO VIRAL:, हावभाव पाहून पोट धरून हसाल!

हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांच्या मताशी सहमती दर्शवत वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडेचार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. एका यूझरने लिहिले आहे, की एकीत शक्ती असते, तर दुसऱ्या यूझरने मुंग्याच्या साहसाला सलाम केला आहे.

Story img Loader