Auto-rickshaw viral video: सोशल मीडियावर अनेकदा भांडणांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी सासू-सुनेचं भांडण तर कधी ट्रेनमध्ये भांडण, कधी विरुद्ध दिशेने गाडी टाकली किंवा ओव्हरटेक केली तर रस्त्यावर होणारी वाहनचालकांची भांडणं आपण अनेकदा पाहतो. या भांडणांचं रुपांतर अनेकदा मारामारीतदेखील होतं आणि परिस्थिती बिकट होते.

अशा भांडणांमध्ये काही जण आपली मर्यादादेखील ओलांडतात, समोरच्याला नको तो बोलतात आणि मनमर्जी चालवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात भांडणाच्या नादात एका रिक्षाचालकाने चक्क कारचालकाला धमकावले, त्याच्या कारचा आरसा फोडला आणि त्याला शिव्यादेखील घातल्या.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
pune incident of speeding car hitting couple on two wheeler on flyover in Gultekdi
मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार
Locals Saved Me Foreigner Argues With Delhi Rickshaw Puller Over Fare
Video : ‘या लोकांमुळे भारतीयांचे नाव खराब होते’, पर्यटकाला लुटण्याचा रिक्षाचालकाचा प्रयत्न; ‘१५०० रुपये दे’ म्हणत परदेशी व्यक्तीच्या मागेच लागला शेवटी…
MIDC police Thane, woman petrol pump director threatened, MIDC police Thane range,
उपराजधानीत गुंडगिरीचा कळस, भीतीपोटी पेट्रोलपंप चालक महिलेचे गुंडांच्या पायावर लोटांगण… व्हिडीओ व्हायरल
Pune Rikshaw Driver Desi Jugaad
‘पुणे तिथे काय उणे…’ थंडीत रिक्षा चालवण्यासाठी रिक्षाचालकाचा जुगाड, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल
bengaluru Viral Video Shows Man Begging Inside Namma Metro Train Probe Underway
“हेच पाहायचे बाकी होते!”, चक्क मेट्रोमध्ये भीक मागतेय ही व्यक्ती! Viral Video पाहून संतापले नेटकरी

हेही वाचा… “या दोघींना पट्ट्याने मारायला हवं”, असं का म्हणतायत नेटकरी, VIDEO पाहून कळेल नेमकं कुठे चुकलं

व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर रस्त्यावर झालेल्या एका भांडणाचा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओत एक रिक्षाचालक कारचालकाशी जोरजोरात भांडताना दिसतोय. व्हिडीओच्या सुरुवातीला आपण पाहू शकतो की, हा रिक्षाचालक कारचा आरसा पायाने लाथ मारून तोडताना दिसतोय. यानंतर रिक्षाचालक कारचालकाला काच खाली घेण्यास सांगतोय.

यादरम्यान रिक्षाचालक, “तू काच खाली घे आणि बोल, तुला ओव्हरटेक करताना समजलं नाही का?” असं त्या कारचालकाला जोरजोरात सांगत असतो आणि कारचा दरवाजा वाजवत असतो.

घटनेची गंभीरता लक्षात घेता कारचालक रिक्षाचालकाचा भांडतानाचा व्हिडीओ काढतो. यावर “व्हिडीओ काढून काय करतो रे”, अशी धमकीदेखील रिक्षाचालक कारचालकाला देतो आणि घाणेरड्या शिव्या देण्यास सुरुवात करतो. या भांडणात कारचालक रिक्षाचालकाला गाडी बाजूला घेऊन बोलण्याची विनंती करतो, पण रिक्षाचालक त्याचं काहीही ऐकत नाही.

हेही वाचा… “शेवटी विषय संस्कारांचा होता”, दोन मुलींनी केलेल्या कृतीने वेधलं सगळ्यांचं लक्ष, VIDEO पाहून कराल कौतुक

हा भांडणाचा व्हिडीओ पुण्यातील असून @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “पुण्यातील ऑटो ड्रायव्हर आणि कार ड्रायव्हरमध्ये जोरदार भांडण” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

युजर्सच्या कमेंट्स

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आजकाल लोक लहान-सहान भांडणालाही मोठं रूप देतात आणि उगाच व्हिडीओ बनवतात”, तर दुसऱ्याने “या ऑटोचालकाला शिक्षा झालीच पाहिजे”, अशी कमेंट केली आहे.

Story img Loader