Accident video: कोणतेही वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीरच आहे. ज्यामुळे आपण स्वतःसोबत इतरांचेही जीव धोक्यात घालतो. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हे अत्यंत धोक्याचे असते. मोबाईलवर बोलताना अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही वाढत आहेत. पण तरीही लोक वाहनचालक जिवाची काळजीच नसल्यासारखे वागत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षांत मोबाईलच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. विशेषत: तरुणांमध्ये मोबाईलबद्दल वेगळंच आकर्षण दिसून येतंय. एक काळ असा होता की, ज्यावेळी दूरच्या नातेवाईकांशी संवाद साधता यावा, त्यांची खुशाली विचारता यावी यासाठी फोनचा वापर केला जायचा. मात्र, आता काळ बदलला आहे. लोकांनी फोनला इतकं अत्यावश्यक बनवून ठेवलं आहे की त्यांना त्यांच्या जीवाचीही पर्वा नाहीये. आता या व्हायरल व्हिडीओतील मुलीकडेच बघा. फोनवर बोलणं मुलीसाठी इतकं महत्त्वाचं होतं की ती गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होती. मात्र पुढच्याच क्षणी तिला हे चांगलंच महागात पडलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी स्कूटी चालवताना मोबाईलवर बोलत आहे. आणि याचदरम्यान तिचा तोल जाऊन बॅलन्स बिघडतो आणि अपघात होतो. धावत्या स्कुटीला एका हाताने थांबवण्याचा प्रयत्नात स्कुटीचा पटकन ब्रेक दाबते. यानंतर ती कॉलवर बोलत असताना स्कुटीवरचे नियंत्रण सुटते आणि रस्त्यावर धावत सुटते. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा स्कुटीवरचे तिचे नियंत्रण सुटते तेव्हा समोरुन एक ट्रक येतो. नशिब बलवत्तर म्हणून ट्रकच्या खाली येण्यापासून महिला बचावली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> एक नवरा, दोन बायका! दोघी नवऱ्यासोबत राहण्यासाठी बेचैन; भररस्त्यात हाणामारीचा VIDEO व्हायरल

व्हिडिओ पोस्ट होताच नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंटस् केल्यात. मुलगी ट्रॅकच्या मधोमध होती म्हणून तिचा जीव वाचला. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. त्यांनी संताप व्यक्त केला आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. सोशल मीडिया एक्स अॅपवरील (ट्वीटर)@DelhiPolice या अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.