सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक गोंडस व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असतात. या लहान मुलांच्या डोक्यात कधी काय विचार येईल, कधी कोणती गोष्ट ते गांभिर्याने घेतील याचा काही नेम नाही. नेमका असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लहान मुलं दिसायला फार गोंडस दिसतात, पण सोबतच इतके हुशार असतात की त्यांच्या हुशारीची कल्पना तुम्ही सुद्धा कधी केली नसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकल्याने त्याच्या आईकडे एक अशी मागणी केलीय, जी ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये लहान मुलगा त्याच्या आईसोबत बोलताना दिसून येत आहे. आईच्या प्रत्येक प्रश्नाला तो अत्यंत मजेदार उत्तरे देत असल्याचं तुम्ही पाहू शकता. त्याच मुलाची आई त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हा मुलगा लहानगा त्याच्या स्वतःच्या लग्नासाठी आईकडे मागणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुलाने आईला सांगितले की, एका चांगल्या मुलीसोबत त्याचं लग्न लावून द्या. हे ऐकून धक्का बसलेल्या आईने त्याला कोणाशी लग्न करायचं आहे, असं विचारलं. त्याला उत्तर देताना हा खोडकर मुलगा म्हणतो की, एक चांगली मुलगी असावी, जी चांगले काम करेल, तिला स्वयंपाक करता आला पाहिजे, याच्या पुढे हा मुलगा आईला आणखी गोडी लावताना म्हणतो की, “आई तु सगळी कामं करते, तु थकली असशील तर ती मुलगी तुला मदत पण करू शकते.”
आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीने स्वतःच्याच लग्नात इतका जबरदस्त डान्स केलाय की बघणारे फक्त बघतच राहिले
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : अन् बघता बघता कागदाप्रमाणे पूल वाहून गेला…हे भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद, पाहा VIRAL VIDEO
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा मुलगा त्याच्या आईला म्हणतो की, तु तुझं आयुष्य पप्पांसोबत जग, तू माझ्यासोबत का राहतेस? इतकंच नाही तर हा मुलगा लग्नानंतर मुलं होण्याबद्दल सुद्धा बोलताना दिसत आहे. या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे. या मुलाच्या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्स एकाहून एक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. यासोबतच नेटिझन्सही या व्हिडीओला भरपूर लाइक आणि शेअर करत आहेत.