लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात रहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे.
सोशल मीडियावर अनेकदा लग्नसोहळ्यातील असे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक वरातीतला अनोखा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय. असा वरातीतला डान्स तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल.
वरातीत मित्राने जे केलं ते एकदा पाहाच…
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अशी आगळी-वेगळी वरात अद्याप कोणी पाहिली नसेल. या व्हिडीओमध्ये वरातीत नवरदेवाच्या मित्राने अतिउत्साहात येऊन जे केलं ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. वराच्या मित्राने वरातीत एका खांद्यावर नवरदेवाला तर दुसऱ्या खांद्यावर नववधूला बसवल्याचं या व्हिडीओमधून पाहायला मिळतंय. इतकंच नव्हे तर त्या दोघांना खांद्यावर घेऊन तो नाचवत आहे. डीजेच्या तालावर अगदी गोल गोल फिरवत तो या नव्या कपलला जोरदार डान्स करत नाचायला लावत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @dj_yash_mh13 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “भावा तू लग्न कर, तुला नाचवायचं मी बघतो” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.८ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
मित्राचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ते काहीही असो, पण भावात ताकद भारी आहे”; तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “भावाचा कान लाल झाला असेल”, तर तिसऱ्याने “भाऊ जोमात नवरदेव कोमात” अशी कमेंट केली. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.