Shocking video: सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. यांपैकी काही व्हिडीओ चांगले तर काही व्हिडीओ संतापजनक असतात. सध्या सोशल मीडियावर असाच मस्तकात जाणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ एका सॅलोनमधला आहे. या व्हिडिओत आपण सॅलोन चालकाचे अत्यंत घाणेरडे आणि किळसवाणे कृत्य केले आहे. सलूनमध्ये मसाज करुन घेण्याची अनेकांना सवय असते. पण हाच मसाज करणे एका ग्राहकासाठी किळसवाणा प्रकार बनलाय. हा व्हिडीओ पाहून पाहिल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.
VIDEO पाहून तुमचाही होईल संताप
या व्हिडीओमध्ये दुकानदारांने ग्राहकाचे डोळे बंद होताच ग्राहकाच्या चेहऱ्यावर मसाज करण्यासाठी आधी क्रीम लावली आणि नंतर त्याच्या तळहातावर वारंवार थुंकत तसाच मसाज केला.ही गलिच्छ घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, स्वत: केशकर्तनकार युसूफनेच रेकॉर्ड केली आहे. व्हिडीओत ग्राहक चेहऱ्यावर क्रीम लावण्यात आली असल्याने डोळे बंद करुन बसलेला दिसत आहे. त्यावेळी युसूफ हातात थुंकतो आणि तीच थूक ग्राहकाच्या चेहऱ्यावर लावतो. यादरम्यान तो दोनदा हातात थुंकतो आणि ग्राहकाच्या तोंडावर घासतो. मसाज करताना डोळे बंद असल्याने ग्राहकाला याबाबत काहीच कळत नाही. उत्तर प्रदेशच्या कनौज येथे ही घटना घ़डली आहे. हातावर थुंकी लावून त्याने ग्राहकाचा फेस मसाज केल्याचा हा संतापजनक प्रकार या व्हिडिओतून समोर आला आहे. ज्यातून स्वच्छतेचे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गुन्हा दाखल
दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कन्नौज पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेत ‘एक्स’वर प्रतिक्रियाही दिली आहे. कन्नौज पोलिसांनी लिहिले की, तलग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Puneri Pati: “केवळ सुसंस्कृत लोकांना सूचना” पुण्यात ‘या’ पाटीची जोरदार चर्चा; PHOTO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
अशी घटना पहिल्यांदाच समोर आलेली नाही. जूनमध्ये, लखनौमधील एका सलूनमध्ये ग्राहकाच्या चेहऱ्यावर थुंकून मसाज करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर एका केशकर्तनाकाराला अटक करण्यात आली होती.
लखनऊच्या सलूनमध्ये धक्कादायक प्रकार घडला होता. ग्राहकाच्या चेहऱ्याला मसाज देताना एका सलून कर्मचाऱ्याने लाळ वापरल्याचे समोर आले होते. यावेळी पोलिसांकडून सलून कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली असून घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.